

36मोशी: शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून मोठ्यांपासून लहानांपर्यंत अनेकजण कुत्र्यांच्या हल्ल्यात जायबंदी झाले आहेत. कचराकुंड्या, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायटी, चौक, सार्वजनिक ठिकाणांचा भटक्या कुर्त्यांनी ताबा घेतल्याचे दिसून येते.
यामुळे नागरिक आणि शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त असून, महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही या कुत्र्यांच्या बंदोबस्त होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भटक्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्त न केल्यास हे भटके कुत्री महापालिका मुख्यालयात सोडू, असा इशारा मोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे. (Latest Pimpri News)
मोशी परिसरातील रोज गॅलक्सी सोसायटी चौक, प्रिस्टीन ग्रीन सोसा. चौक, वाघेश्वर कॉलनी, ऐश्वर्यम हमारा सोसायटी चौक, गंधर्व एक्सलन्स सोसायटी परिसरात भटक्या कुर्त्यांनी उच्छाद मांडला आहे. सोसायटीधारक या भटक्या कुर्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. अंधारामध्ये ये-जा करणे मुश्किल झाले आहे. दुचाकीवरून जाताना कुत्री मागे लागतात.
जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते, त्यामुळे त्रस्त नागरिकांनी महापालिका अधिकार्यांना वारंवार सांगितले. तरीही भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात आला नाही. सामाजिक कार्यकर्ते निखिल बोर्हाडे, रवी जांभुळकर, निलेश बोराटे, तथा मोशी ग्रामस्थांनी महापालिका अधिकार्यांना कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याचा इशारा दिला आहे.
येत्या आठ दिवसांत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी न केल्यास कुत्री कार्यालयात आणून सोडू, भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली नागरिक वावरत आहेत. कुत्र्यांच्या बंदोबस्त करा म्हणून, मागील काही दिवसांपासून संपर्क केला जातोय, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
- निखिल बोर्हाडे, सामाजिक कार्यकर्ते
उन्हाळा-पावसाळा कुर्त्यांनी उच्छाद मांडलेला आहे. सोसायटीधारक त्रस्त झाले आहेत. अधिकारी झोपेच सोंग घेऊन आहेत. वारंवार सांगूनही कुठल्याही प्रकारचा कुत्र्यांच्या बंदोबस्त केला जात नाही. अनेकदा या कुर्त्यांनी नागरिकांना चावा घेतला आहे. या परिसरात अनेक शाळा आहेत, त्या पालक-पाल्यांना शाळेत जातानासुद्धा जीव मुठीत घेऊन जावे लागत आहेत. तत्काळ भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा.
- रवी जांभुळकर, सामाजिक कार्यकर्ते.
पावसाळ्यामध्ये कुत्र्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कंट्रोल करताना वेळ लागत आहे. मोशीतून तक्रारी आलेल्या लवकरच भटक्या कुर्त्यांची नसबंदी करून सोडले जाईल. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण खूप वाढल्याच्या तक्रारी आहेत. एक-एक तक्रार सोडविण्याचे काम सुरू आहे.
- डॉ. अरुण दगडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका