

illegal cylinder sale case
पिंपरी: भोसरी येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 10) सायंकाळी भगतवस्ती, भोसरी येथे करण्यात आली.
महेश माधवराव मोरे (32, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साळवे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश मोरे हा बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर खरेदी करून मोठ्या टाक्यांमधून छोट्या 4 किलो वजनाच्या टाक्यांमध्ये धोकादायकरित्या गॅस रिफिल करत होता.
कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गॅससाठा विकत होता. त्याच्याकडून 33 हजार 600 रुपयांचा अवैध गॅस साठा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. भोसरी पोलिस तपास करत आहेत.