Akurdi Zoological Survey Museum: आकुर्डीत देशातील पहिले एकात्मिक प्राणिशास्त्र संग्रहालय; पिंपरी-चिंचवडची नवी ओळख

भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पश्चिमी प्रादेशिक केंद्राचे अत्याधुनिक रूपांतर; संशोधन, संवर्धन आणि शिक्षणाचा संगम
Akurdi Zoological Museum
Akurdi Zoological MuseumPudhari
Published on
Updated on

राहुल हातोले

पिंपरी: भारतीय प्राणी सर्वेक्षण (झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया)च्या पश्चिमी प्रादेशिक केंद्रातील आकुर्डी येथील प्राणिशास्त्र संग्रहालयाचे अत्याधुनिक स्वरूपात नूतनीकरण करण्यात येत असून, देशातील पहिले आणि सर्वात मोठे एकात्मिक प्राणिशास्त्र संग्रहालय आकुर्डी येथे उभारले जाणार आहे. देशभरात भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेची एकूण 16 प्रादेशिक केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी पश्चिम घाट क्षेत्राचा अभ्यास करणारे पश्चिमी प्रादेशिक केंद्र आकुर्डी येथे आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाचा काही भाग आणि गुजरातचा काही भाग या केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो.

Akurdi Zoological Museum
Pimpri Chinchwad Water Shortage: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाई व दूषित पाण्यावरून सभागृहात संताप

नूतनीकरणानंतर येथे संग्रहालय, संशोधन प्रयोगशाळा, सभागृह आणि नमुना संकलन विभाग एकाच छताखाली असलेले देशातील पहिलेच कार्यालय निर्माण होणार आहे. त्यामुळे संशोधन, शैक्षणिक उपक्रम आणि जनजागृती यांना एकाच ठिकाणी चालना मिळणार आहे.

विभागनिहाय डिजिटल डिस्प्ले आणि माहितीपूर्ण इंटरॅक्टिव्ह सादरीकरण

स्वतंत्र सभागृह व अत्याधुनिक प्रयोगशाळा, नमुना संकलन व जतन करण्यासाठी आधुनिक सुविधा या सर्व सुविधांमुळे संशोधन, जतन आणि शिक्षण यांचा समन्वय साधणारे हे केंद्र देशातील एक आदर्श मॉडेल ठरेल.

शाखेचा इतिहास

भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेची पश्चिम प्रादेशिक शाखा पूर्वी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे कार्यरत होती. त्यानंतर पौड फाटा येथे तिचे विस्तार केंद्र सुरू करण्यात आले. आकुर्डी प्राधिकरणात 1998 मध्ये स्वतंत्र इमारतीतून कार्यालय सुरू झाले. आता तीन दशकांनंतर या केंद्राचा विस्तार होऊन ते अत्याधुनिक स्वरूपात विकसित केले जाणार आहे.

Akurdi Zoological Museum
Pimpri Chinchwad Stray Dog Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांवरून महापालिकेत गदारोळ; आठ महिन्यांत २० हजारांना चावा

संस्थेची देश- विदेशात ओळख

1916 मध्ये स्थापन झालेली भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था ही भारतातील प्राणीशास्त्रीय सर्वेक्षणासाठी अग्रगण्य संस्था मानली जाते. जगभरातील पर्यावरण आणि जैवविविधता क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोजक्या प्रमुख संस्थांमध्ये तिचा समावेश होतो. संस्था देशातील धोक्यात आलेल्या प्रजाती, त्यांच्या नष्ट होण्यामागील कारणे आणि आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, वर्गीकरण आणि संवर्धन यामध्ये संस्थेचे मोठे योगदान आहे.

पिंपरी-चिंचवडची नवी ओळख

आकुर्डीतील या प्रकल्पामुळे संशोधन, संवर्धन आणि शैक्षणिक उपक्रम यांचा संगम घडवून आणणारे हे संग्रहालय केवळ पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचे जैवविविधता केंद्र ठरणार आहे; तसेच हे अत्याधुनिक प्राणिसंग्रहालय पिंपरी-चिंचवड शहराची नवी ओळख निर्माण करेल.

अभ्यास, संरक्षण अन्‌‍ जनजागृती

या प्रकल्प उभारणीमध्ये प्राण्यांचा शास्त्रीय अभ्यास, जैवविविधतेचे संरक्षण, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणे आहे. आकुर्डी येथील अत्याधुनिक प्राणी संग्रहालयामुळे शहराचा शैक्षणिक आणि वैज्ञानिक नकाशावर एक नवा टप्पा सुरू होऊ शकेल. भविष्यात हे केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Akurdi Zoological Museum
Charholi Bailgada Sharyat: चऱ्होलीत श्री वाघेश्वर महाराज यात्रोत्सव जल्लोषात; ३५ लाखांच्या बैलगाडा शर्यतीत थरार

अभ्यासासाठी जतन केलेले दुर्मीळ नमुने

आकुर्डी येथील संग्रहालयात कीटक, मासे, कोळी, सरडे, बेडूक, कासव, हरीण, चित्ता, अजगर, मुंगूस, पोपट आदी विविध प्राण्यांचे मूळ स्वरूपातील नमुने रासायनिक प्रक्रिया करून जतन करण्यात आले आहेत. काही नमुने दोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. हे नमुने विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि सर्वसामान्यांना अभ्यासासाठी मोफत उपलब्ध आहेत. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, निसर्गाशी जवळीक वाढावी आणि जैवविविधतेचे महत्त्व पटावे हा या संग्रहालय उभारणीमागील प्रमुख उद्देश आहे. दर महिन्याला शाळा आणि महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थी येथे भेट देतात. एम.एससी आणि पीएचडी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

नियोजित संग्रहालयातील सुविधा

  • भव्य आणि आकर्षक चार मजली इमारत

  • संपूर्ण इमारतीवर सोलर पॅनल.

  • दोन गुंठ्यांपेक्षा अधिक जागेत आधुनिक संग्रहालय.

Akurdi Zoological Museum
Pawna Dam Drowning Incident: पवना धरणात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नव्या प्रकल्पामुळे भविष्यात वातावरणीय बदलांचा प्राणी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः पाण्यावरील बदल, जैवसाखळीतील बदल आणि परिसंस्थेतील समतोल यांचा अभ्यास करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कार्यालयाच्या नव्या इमारतीत प्राण्यांचे अधिकाधिक नमुने संकलित आणि संरक्षित केले जातील. दोनशे वर्षांपूर्वीचे नमुने पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. लंडन, बेल्जियम, नेदरलँड्स यांसारख्या देशांप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीत वैज्ञानिक हब विकसित होत आहे. भविष्यात हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल

डॉ. धृती बॅनर्जी, संचालिका, भारतीय प्राणी सर्वेक्षण कार्यालय, कोलकाता

देशभरातील एम.एससी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संग्रहालयाचा मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी संशोधनाची सुवर्णसंधी असेल. दर महिन्याला अनेक विद्यार्थी येथे भेट देतात. नव्या स्वरूपातील संग्रहालयामुळे ज्ञानात अधिक भर पडेल.

डॉ. बासुदेव त्रिपाठी, प्रभारी अधिकारी, भारतीय प्राणी सर्वेक्षण कार्यालय,आकुर्डी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news