Private Tuition by Teachers: शालेय शिक्षकांच्या खासगी शिकवणीला चाप; तळेगावात नियमभंग करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई

या निर्णयानुसार, शासकीय व अनुदानित शाळांतील शिक्षकांना खासगी शिकवणी घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
Private Tuition by Teachers
Private Tuition by TeachersPudhari
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे: शाळेतील शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या बेकायदेशीर खासगी शिकवणीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तळेगाव शहर युवक काँग्रेसच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे केली होती.

त्या अनुषंगाने नगर परिषद शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने नगर परिषद शाळा, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळा यांच्या नावे शासन निर्णय काढण्यात आला आहे.

Private Tuition by Teachers
TET Exam: तीन दशके सेवा करूनही पुन्हा पात्रता सिद्ध करण्याची वेळ; अनुभवी शिक्षकांवर टीईटीची सक्ती

या निर्णयानुसार, शासकीय व अनुदानित शाळांतील शिक्षकांना खासगी शिकवणी घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच आचारसंहिता व खासगी शिकवणी संदर्भातील तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शिस्तभंग करणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाहीची तरतूद सुद्धा या शासन निर्णयात करण्यात आली आहे.

सदर विषयांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळेच्या नियमित अध्यापन प्रक्रियेतून उपलब्ध करून देणे ही शाळा व शिक्षकांची मूलभूत जबाबदारी आहे. तथापि काही ठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यासाठी प्रवृत्त करणे, व्यावसायिक स्वरूपाचे कोचिंग वर्ग चालविणे अथवा नियमबाह्य पद्धतीने शिकवणी घेणे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आपल्या स्तरावर आवश्यक दक्षता घेऊन बेकायदेशीर खासगी शिकवणीस प्रतिबंध करावा व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल पंधरा दिवसांच्या आत कार्यालयात सादर करावा, असा शासन निर्णय अनिता वैद्य प्रशासन अधिकारी नगर परिषद शिक्षण मंडळ तळेगाव नगरपरिषद यांच्या वतीने देण्यात आला आहे.

खालील नियमांचे पालन करणे आवश्यक

शासकीय व अनुदानित शाळांतील कोणत्याही शिक्षकास खाजगी शिकवणी किंवा खासगी अध्यापन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व शिक्षकांकडून 'मी कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी घेत नाही' याबाबत लेखी घोषणा/ हमीपत्र घेण्यात यावे.

Private Tuition by Teachers
Baramati Water Crisis: बारामतीच्या जिरायत पट्ट्यातील तलाव कोरडेठाक

शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा पालकांना विशिष्ट खासगी शिकवणीबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा शिफारस करण्यात येऊ नये.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी शाळा स्तरावर अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग किंवा अभ्यासपूरक उपक्रम राबविण्यात यावेत.

कोणत्याही विद्यार्थ्यास खासगी शिकवणीसाठी प्रवृत्त करणे, सक्ती करणे किंवा प्रलोभन देणे यास सक्त मनाई असल्याबाबत सूचना द्याव्यात.

सर्व खासगी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना संबंधित कायदे, नियम व त्यातील तरतुदींची लेखी माहिती द्यावी.

खासगी शाळेतील शिक्षकांकडून शाळेबाहेर घेतल्या जाणाऱ्या शिकवणीवर्गाबाबत पालक, विद्यार्थी किंवा नागरिकांकडून प्राप्त तक्रारींची गोपनीय व निपक्ष चौकशी करावी व नियमांचे उल्लंघन आढळल्यास, संबंधित शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देऊन प्रचलित नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी.

शाळा व्यवस्थापन समिती व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत या विषयाचा आढावा घेऊन आवश्यक निर्णय नोंदवावेत.

शाळेतील सूचना फलकावर विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीसाठी सक्ती अथवा दबाव टाकणे गैरप्रकार असून, त्याबाबत तक्रार करता येईल, अशा सूचना प्रदर्शित कराव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news