

पिंपरी: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देण्यात येतो. पिंपरी-चिंचवड विभागातून 3435 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी 407 जागा अद्याप रिक्त आहेत. तर 3 हजार 28 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड विभागामध्ये 170 शाळा होत्या. त्यामध्ये 3 हजार 435 जागांसाठी पालकांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीमध्ये 3435 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली. त्यामधील 2275 विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतला. दुसर्या फेरीमध्ये लॉटरी लागलेल्या 1046 विद्यार्थ्यांपैकी 499 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर, तिसर्या फेरीमध्ये 426 जणांची सोडत निघाली, त्यापैकी 183 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. (Latest Pimpri News)
चौथ्या आणि पाचव्या फेरीमध्ये अनुक्रमे 138 पैकी 47 आणि 56 पैकी 24 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. पाच फेर्यानंतर शहरातील एकूण 3028 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. पाच फेर्यांनंतरही अनेक पालकांनी प्रवेश घेतले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 407 जागा रिक्त राहिल्या आहेत. शिक्षण विभागाच्यावतीने कागदपत्र पडताळणीसाठी उन्नत केंद्राची स्थापना करण्यात आली होती.
अॅपच्या माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे शाळा आणि अर्जदाराचे घराचे ठिकाण याचे अंतर ठरविण्यात आले होते. त्यामुळे प्रक्रिया सुरळित होण्यास मदत झाली. पाच फेर्या पूर्ण झाल्या असून आरटीईची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
पाच फेर्यानंतर आरटीईची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली. शहरामध्ये 3435 जागांपैकी 3028 जागांवर प्रवेश झाले. यंदा वेळेत सर्व प्रक्रिया पार पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- संगिता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग