

पिंपरी : पिंपरी- चिंचवडमधील तळवडे आग दुर्घटनेप्रकरणी कारखाना चालक आणि मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी शरद सुतार, शरद सुतार, जन्नत नजीर शिकलगार आणि नजीर अमीर शिकलगार ही गुन्हा दाखल केलेल्यांची नवे आहेत. नजीर अमीर शिकलगार याला देहूरोड पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. काल तळवडे या ठिकाणी शुक्रवारी तीनच्या सुमारास स्पार्कल कॅण्डल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली होती. यात सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 10 जण गंभीर जखमी झाले होते.
जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनापरवाना कारखाना त्याचबरोबर कामगारांच्या सुरक्षतेबाबत केलेली तडजोड, स्पार्कल कॅण्डल बनवण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक, ज्वालाग्राही पदार्थ हा बेकायदा वापरला जात होता. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा तर दाखल झाला पण त्या निष्पाप जीवांची भरपाई कशी करणार? ज्यांनी आपले आप्त गमावले त्यांना न्याय कसा मिळणार? ह्या घटना काही एक घडत नसून, आजूबाजूला अशा घटनांची पुनरावृत्ती होत असते, ती होउ नये यासाठी प्रशासनानेही दक्ष असायला हवे. अशी भावना नागरिक व्यक्त करतांना दिसत आहे.
हेही वाचा