

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रीवा जिल्ह्यात एका विमानाचा अपघात झाला. ही दुर्घटना गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. यात पायलटचा मृत्यू झाला. तर विमानातील प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने आज (दि.६) सांगितले.
चोरहट्टा एअरस्ट्रीपपासून तीन किमी अंतरावर हे विमान एका मंदिराच्या घुमटावर आणि एका झाडाला आदळल्यानंतर क्रॅश झाले, असे चोरहट्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जे. पी. पटेल यांनी सांगितले.
या अपघातात कॅप्टन विशाल यादव (वय ३०) यांचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी पायलट अंशुल यादव जखमी झाला आहे. त्यांना संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेवाचे जिल्हाधिकारी मनोज पुष्प आणि पोलीस अधीक्षक नवनीत भसीन घटनास्थळी दाखल झाले होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही, असे जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?