विजय देवरकोंडा आणि अनन्याने शेअर केले असे फोटो की चाहते विचारू लागले ‘साखरपुडा केला की काय?’

विजय देवरकोंडा आणि अनन्याने शेअर केले असे फोटो की चाहते विचारू लागले  ‘साखरपुडा केला की काय?’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क :  विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे ही जोडी 'लायगर'च्या प्रमोशनच्या निमित्ताने एकत्र दिसत आहेत. विजय देवरकोंडा 'लायगर' मधून बॉलीवूड पदार्पण करतो आहे. अर्जुन रेड्डी फेम विजयचं दाक्षिणात्य फॅन्सप्रमाणे बॉलीवुडमध्येही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच दक्षिणेत सुपरहिट ठरल्यानंतर विजय बॉलीवुडमध्ये नशीब आजमावू पाहतो आहे. बॉक्सरच्या जीवनावर बेतलेल्या या सिनेमाने ट्रेलरपासूनच प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे या सिनेमात जागतिक कीर्तीचे बॉक्सर माइक टायसन यांचाही खास अपियरन्स असणार आहे.

पण या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक नवीनच बाब समोर येते आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. विजयच्या हैदराबादमधील घरातला हा फोटो असून हे दोघेही शेजारी सोफ्यावर बसले आहेत.

या दोघांच्या एका बाजूला काही पंडीत आहेत तर दुस-या  बाजूला विजयची आई आहे. हे सर्वजण एका पुजा विधीमध्ये व्यस्त दिसत आहेत. हे फोटो अनन्या आणि विजयने पोस्ट केले आणि चाहत्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. या दोघांनीही 'लायगर'च्या प्रमोशन दरम्यान साखरपुडा उरकल्याची बातमी व्हायरल झाली.

अनेकजणांनी अभिनंदनही केलं. पण या फोटोंमागचं सत्य मात्र काहीतरी वेगळं आहे. विजयच्या आईने या जोडीसाठी घरी पुजा ठेवली होती. या जोडीच्या यशासाठी आणि ईश्वराच्या कृपेसाठी ही पूजा ठेवल्याचं विजयने यावेळी सांगितलं. यानंतर या जोडीने हाती कलावा (एक प्रकारचा धागा ) बांधलेला फोटोही शेअर केला आहे. मार्शल आर्ट्स- बॉक्सरची व्यक्तिरेखा या सिनेमात विजय साकारतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news