Petrol Price Hike : पेट्रोल 50 तर, डिझेल 75 रुपयांनी महागले, ‘या’ देशातील जनतेला मोठा झटका!

पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Price Hike) वाढ होण्याची शक्यता अनेक जाणकरांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या श्रीलंकास्थित उपकंपनीने श्रीलंकन नागरिकांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता भारतातही यावरून चर्चा रंगली आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Price Hike) ऐतिहासिक वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. ११), श्रीलंकेतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या उपकंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने पेट्रोलच्या किरकोळ किमतीत ५० रुपये आणि डिझेलच्या दरात ७५ रुपयांनी वाढ केली आहे, त्यानंतर श्रीलंकेत पेट्रोलची किंमत प्रति लिटर २५४ आणि डिझेलची किंमत प्रति लिटर २१४ रुपयांवर पोहोचली आहे.

खरं तर, श्रीलंकन ​​रुपयाच्या प्रचंड अवमूल्यनामुळे कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती वाढवल्या असल्याचे समजते आहे. एका महिन्यात कंपनीने इंधनाचे दर वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. (Petrol Price Hike)

एलआयओसी (LIOC)ला श्रीलंका सरकारकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. एलआयओसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज गुप्ता यांनी या बाबत मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, सात दिवसांत, श्रीलंकन ​​रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५७ रुपयांनी घसरला आहे. याचा थेट परिणाम तेल आणि पेट्रोल उत्पादनांच्या किमतीवर झाला. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चात्य देश रशियावर निर्बंध लादत आहेत, त्यामुळे तेल आणि गॅसच्या किमतीही वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आमचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

युद्धामुळे कच्चे तेल महागले..

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. मात्र, या वाढलेल्या किमतींचा परिणाम भारतात अद्याप जाणवलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र आता येत्या काही दिवसांत भारतातही पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता खूप वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news