

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="See More Web Stories" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहालीच्या बिंद्रा स्टेडीअमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. 154 धावांचा पाठलाग करताना पंजाबने गुजरातला अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले. पंजाब किंग्ज संघाकडून कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) या सामन्यात अनोखा विक्रम करत मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले.
गुजरातविरुद्ध सामना सुरु होण्याआधी कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) 100 बळी घेण्यासाठी अवघ्या एका विकेटची गरज होती. गुजरातच्या डावाच्या पाचव्या षटकात रबाडाने वृद्धीमान साहाला मॅथ्यू शॉर्टकरवी झेलबाद करत आयपीएलमध्ये बळींचे शतक पूर्ण केले.
याचबरोबर रबाडाने (Kagiso Rabada) आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 बळी पूर्ण करणा-या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. त्याने 64 डावांमध्ये ही विक्रमी कामगिरी केली असून त्याच्या आधी श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगाने 70 डावांमध्ये 100 बळी घेण्याची किमया केली होती.
कगिसो रबाडा (द. आफ्रिका) : 64 डाव
लसिथ मलिंगा (श्रीलंका) : 70 डाव
भुवनेश्वर कुमार (भारत) : 81 डाव
राशिद खान (भारत) : 83 डाव
अमित मिश्रा (भारत) : 83 डाव
आशिष नेहरा (भारत) : 83 डाव
युजवेंद्र चहल (भारत) : 84 डाव