

प्रत्येकाला वाटत असते की, आपले बाळ गुटगुटीत असावे, निरोगी असावे. बाळ निरोगी राहाण्यासाठी प्रथम त्याच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. बाळाच्या जन्मापासून ते एक वर्षापर्यंत कटाक्षाने त्याच्याकडे लक्ष दिले तर नक्कीच तुमचे बाळ निरोगी राहील.
बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आईचे दूध हेच मुख्य अन्न असते. पहिले तीन दिवस दुधामध्ये चिकट द्रव येत असतो. काही वेळा हा चिकट द्रव आहे म्हणून काढून टाकला जातो; पण हेच मोठे पौष्टिक अन्न असते. हा चिकट द्रव तीन दिवस पाजला असता बाळाला पौष्टिक अन्न मिळते. हा चिकट द्रव प्रतिकार शक्ती वाढवणारा असतो. आईचे दूध सहा महिन्यांपर्यंत बाळाला द्यायला हवे. सहाव्या महिन्यांपर्यंत आईचे किंवा पावडरचे दूध हेच मुलांचे मुख्य अन्न असते. दहाव्या—बाराव्या महिन्यांत त्याच्या आहारात अंड्यातील पिवळ्या बलकाचाा समावेश करावा. मूल एक वर्षाचे होईपर्यंत त्याला पूर्ण अंडे देऊ नये. कारण, एक वर्षाआधी अंड्यातील पांढरा भाग मुलाच्या खाण्यात आल्यास तो त्यास बाधा आणू शकतो. मूल एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला थोड़्या प्रमाणात चीज देण्यास हरकत नाही.
साधारण दहा ते बाराव्या महिन्यांपर्यंत खाण्यापिण्याच्या सवयीचे वेळापत्रक बसून जाते. मोठ्या व्यक्तीप्रमाणे लहान मुलांनाही दोनवेळच्या नियमित खाण्याबरोबर आणखी दोनवेळचे खाणे लागते.
मूल साधारण दहा महिन्यांचे झाल्यानंतर मोठ्या माणसाने त्याच्या तोंडाशी पाण्याचा कप धरला असता तो त्यातून पाणी, दूध पिऊ शकतो. तेव्हा बाटली ऐवजी त्याला कपातूनच पाणी, दूध व रस पाजावा. सुरुवातीला हे प्रमाण थोडे ठेवावे. ते हळूहळू वाढवत न्यावे. याच वेळेत काही मुलांची स्तनपानाची अथवा बाटलीतून दूध पिण्याची सवय तुटते. बहुतेक मुलांना आणखी काही महिने बाटलीची गरज भासते.
साधारण 1 वर्षानंतर मुले अंगावर दूध पिणे सोडतात. ही सवय एक वर्षानंतर कायम असेल, तर कपातून दूध किंवा पाणी पाजून त्यांची ही सवय मोडता येते. जी मुले घन पदाथार्ंपेक्षा दूध अधिक घेतात त्यांच्या पोषणाच्या गरजा नीट भागल्या जात नाहीत. त्यामुळे 1 वर्षानंतर त्यांना मऊ तूप भात, मेतकूट, भाकरी—भाजी असा आहार द्यावा. यामुळे मुले निरोगी राहतात. इतके जरी पहिल्या वर्षापासून
केले तर मुलांच्या आरोग्याचा पाया नक्कीच भक्कम होईल.