

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 : बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने इतिहास घडवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्याने क्वार्टर फायनलमध्ये चायनीज तैपेईच्या चेन चौ तिएनला 18-21, 21-15, 21-12 ने पराभव केला. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन एकेरीची उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. या सामन्यात दोन्ही स्टार्समध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दोन्ही स्टार्स एक-एक गुणासाठी संघर्ष करताना दिसले.
पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेनची सुरुवात खराब झाली. त्याने पहिले दोन गुण गमावले. पण त्यानंतर त्याने बरोबरी साधली. इथून पुढे 15 गुणांपर्यंत लक्ष्य कधी पिछाडीवर पदायचा तर कधी बरोबरी साधायचा. पण यानंतर त्याने पल्यांदाच तैपेईच्या खेळाडूला मागे टाकले आणि तीन गुणांची आघाडी घेऊन स्कोअर 18-17 केला. पण ही आघाडी त्याला कायम ठेवता आली नाही. चेन चौ तिएनने लक्ष्यची आघाडी मोडीत काढली आणि पुढे सलग तीन गुण मिळवून पहिला गेम 18-21 ने जिंकला. या गेमनंतर लक्ष्य सामन्यात 0-1 ने पिछाडीवर पडला.
दुस-या गेममध्ये लक्ष्य सेनने झुंझार पुनरागमन केले. त्याने हा गेम 21-15 ने जिंकला. यासह सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली गेली.
तिसऱ्या सेटमध्ये लक्ष्य सेन आणि चाऊ तिएन चेन यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्याच्या सुरुवातीला लक्ष्यने आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर चौ तियान चेनने पुनरागमन करत काही महत्त्वाचे गुण मिळवले. शेवटी लक्ष्यने आपला संयम राखला आणि गेमसह सामना जिंकला.