

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी ( दि. ३ ) सायंकाळी त्यांच्यावर गाोळीबार झाला होता. माझ्या हत्येचा कट रचण्यात पाकिस्तान लष्करातील एका वरिष्ठ
अधिकार्याचा सहभाग आहे, असा आरोप इम्रान खान यांनी केला. याची गंभीर दखल पाकिस्तानच्या लष्कराने घेतले आहे.
पाकिस्तान लष्करामधील जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, "इम्रान खान यांनी पाकिस्तान
लष्कर आणि विशेष म्हणजे अधिकार्यांवर केलेले आरोप निराधार आहेत. या प्रकरणी इम्रान खान यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस पाकिस्तान लष्कराने सरकारकडे केली आहे." दरम्यान तहरीक-ए- इन्साफ ( पीटीआय ) पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
गुरुवार, ४ नाोव्हेंबर रोजी पंजाब प्रांतातील वजीराबाद येथील सभेपूर्वी इम्रान खान यांच्यावर गाोळीबार झाला. त्यांच्या पायाला गाोळ्या लागल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, गृहमंत्री राना सनाउल्लाह आणि आयएसआय (पाकिस्तानची गु्प्तचर संघटना ) मधील मेजर जनरल फैसल यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर गोळीबार झाला, असा आरोप इम्रान खान यांनी केला होता. हे आरोप निराधार आहेत. पाकिस्तानचे लष्कर ही एक शिस्तबद्ध संघटना आहे. आम्हाला याचा गर्व आहे. एखादा अधिकारी बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याची चैाकशीचे अधिकार आहेत, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानपदी असताना सरकारला मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्या करणी इम्रान खान यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यामुळे निवडणूक आयाोगाने इम्रान खान यांची खासदारकी रद्द केली आहे. तसेच त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. आता लाहोर उच्च न्यायालयात दाखल याचिकेत इम्रान खान यांना पीटाआय अध्यक्षपदावरुन हटविण्यात यावे, अशी याचिका दाखल करण्यात आली असून, यावरील सुनावणीस न्यायलयाने मंजुरी दिली आहे.