Teacher’s BLO Duty : निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचे आदेश

Teacher’s BLO Duty : निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचे आदेश
Published on
Updated on

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : मुंबईतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटीतून वगळून अन्य कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक २२ फेब्रुवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांनी काढले. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली.

शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना परीक्षा कालावधी असल्याने बीएलओ ड्युटीसाठी नियमित कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना घेतल्यास शाळा चालवणे अवघड जाईल. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व दहावी बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी यांनी परिपत्रक काढून बीएलओ डियुटीतुन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ड्युटीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news