Latest
Operation Kaveri : सुदानमधून आतापर्यंत १ हजार ९५४ नागरिकांची सुटका
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत युध्दग्रस्त सुदानमधून (Sudan) आतापर्यंत 1 हजार 954 नागरिकांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. शनिवारी (दि. ३०) रात्री सुदानमधून 229 नागरिकांना विशेष विमानाने भारतात आणले गेले होते. त्याच्या एक दिवस आधी दोन विमानांमधून 754 लोकांना मायदेशी परत आणण्यात आले होते. (Operation Kaveri)
सुदानचे लष्कर आणि तेथील निमलष्करांदरम्यान सत्तेवरून हिंसक संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत या हिंसाचारात शेकडो लोकांचा बळी गेलेला आहे. सुदानच्या विविध भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ऑपरेशन कावेरी हाती घेतले होते. मोहिमेअंतर्गत नागरिकांना प्रथम सौदी अरेबियातील जेद्दा येथे आणि तेथून भारतात आणले जात आहे. जेद्दा येथे यासाठी ट्रान्झिट कॅम्प बनविण्यात आला आहे. (Operation Kaveri)
नागरिकांच्या सुटकेसाठी व्यावसायिक विमानांसोबत सी 17 ग्लोबमास्टर हे हवाई दलाचे विमान वापरले जात आहे. सुदानची राजधानी खार्टुममध्ये हिंसाचाराचा प्रभाव जास्त आहे. नागरिकांच्या सुटकेसाठी भारताकडून नौदलाच्या जहाजांही उपयोग केला जात आहे.
हेही वाचा

