

नरेंद्र साठे
पुणे : शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाकडून पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेचा तीन महिन्यांत पुण्यात केवळ 53 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी घेतलेल्या 244 शिबिरांमध्ये 423 शेतकर्यांचे अर्ज आले होते. जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून शुक्रवारी विविध गावांमध्ये शिबिरे घेतली जात आहेत.
काय आहे योजना…
पुण्यामध्ये 15 सप्टेंबरपासून सुरू झालेली पशू किसान क्रेडिट कार्ड योजना 15 मार्च 2023 राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पशुधन खरेदीसाठी शेतकर्यांना 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतचे कर्ज कुठल्याही तारणशिवाय उपलब्ध करून दिले जाते.
गाई-म्हशींसाठी किती पैसे मिळतील?
गाईसाठी 20,000 रुपये देण्याची तरतूद आहे.
म्हशीसाठी 22,000 रुपये दिले जातील. हे प्रति म्हैस असेल.
दहा शेळ्या-मेंढ्यांसाठी, शंभर कोंबड्यांसाठी, मत्सव्यवस्थापनाठी कर्ज दिले जाईल.
कार्डसाठी ही कागदपत्रे आवश्यक…
अर्जदाराचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड.
मोबाईल क्रमांक.
पासपोर्ट आकाराचा फोटो.
असा करा अर्ज…
– किसान क्रेडिट कार्डसाठी जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकचा तपशील उपलब्ध आहे.
क्रेडिट कार्डसाठी पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत बँकेत जमा करावी.
कार्ड घेण्यासाठी बँकेची फी रद्द केली आहे.
जवळच्या फिरते पशुचिकित्सालय किंवा पशुधन विकास अधिकारी किंवा सहायक पशुधन विकास अधिकार्यांशी समन्वय साधूनदेखील अर्ज करता येतो.
शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना फायदेशीर ठरणार आहे. शेतकर्यांना पशुधन खरेदीसाठी या योजनेमुळे हातभार लागणार आहे. बँकांशी समन्वय करून जिल्ह्यामध्ये शिबिरे सुरू आहेत. जास्तीत जास्त शेतकर्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
– डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.