Holi 2024 : होळी सणासाठी आता गोवऱ्याही मिळतात ऑनलाईन

Holi 2024 : होळी सणासाठी आता गोवऱ्याही मिळतात ऑनलाईन
Published on
Updated on


ऑनलाईन कंपन्यांच्या साईटवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, कपडे, खाद्यपदार्थ यासारख्या वस्तूंप्रमाणेच आता शेणाच्या गोवऱ्याही ऑनलाईन शॉपिंगवर विकत मिळत आहेत. खरे वाटत नाही ना? पण खात्री पटवायची असेल तर कोणत्याही ऑनलाईन कंपनीच्या साईटवर जावून फक्त 'काऊ डंग केक' (Cow Dung Cake) एवढेच टाईप करा. त्या साईटवर विविध दरात गोवऱ्या उपलब्ध होत आहे. (Holi 2024)

ऑनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा वाढता कल असल्याने ऑनलाईन शॉपिंग आता नवे राहिलेले नाही. विविध माध्यमातून सवलतीच्या दरात वस्तू विकण्याचा प्रकार सुरु आहे. दुकानांपेक्षा स्वस्तात वस्तू मिळत असल्याने अनेकांची पसंती ही ऑनलाईन शॉपिंगवर पडत आहे. गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीय ग्राहकांचा कल असतो. सणासुदीच्या काळात तर या ऑनलाईन शॉपिंगमध्ये सवलत दिली जाते. तसेच विविध प्रकारच्या ऑफर्स या काळात दिल्या जातात. सर्वच ठिकाणी ऑनलाईन शॉपिंगवाल्यांनी आता अनेकांना भुरळ घातली आहे. मात्र, या साईटवर आता शेणाच्या गोवऱ्याही विकत मिळतात. त्यामुळे या गोवऱ्यांना चांगली मागणी आहे. तसेच पावसाळी व इतर हंगामांमध्ये चूल पेटवण्यासाठी वापर करता येईल. गोवऱ्यांचा होमहवनासाठीही वापर केला जात आहे. (Holi 2024)

या गोवऱ्या आता पॅकींगमधून घरापर्यंत पोहोचत आहेत. त्या कुठल्याही ऑनलाईन शॉपिंगच्या साईटवर खरेदी करता येऊ शकतात. फक्त एवढेच आहे की गोवऱ्यांच्या साईजप्रमाणे गोवऱ्यांची किंमत आकारली गेली आहे. साधारणतः ५ इंचाची १८ गोवऱ्यांची किंमत २८० आहे. गोवऱ्यांच्या साईजप्रमाणे गोवऱ्यांची किंमत आहे. (Holi 2024)

Holi 2024 : पिचकारी रंगही ऑनलाईन

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनसाठी लागणारे पिचकारी, रंगही ऑनलाईन उपलब्ध आहेत. कोरडे रंग, ओले रंग शिवाय रंगाचे स्प्रे ऑनलाईन उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर धुलीवंदनसाठी स्पेशल कपल ड्रेस, लहान मुलांसाठी हॅपी होली, मेरी पहली होली असे प्रिंट केलेले टी शर्ट उपलब्ध आहेत, याला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news