New Zealand Squad ODI World Cup : विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन बनला कर्णधार

New Zealand Squad ODI World Cup : विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन बनला कर्णधार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : New Zealand Squad ODI World Cup : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली. दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरगमन करणा-या केन विल्यमसनकडे नेतृत्व देण्यात आले आहे. आयपीएल 2023 दरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. त्यातून तो आता पूर्णपणे बरा झाल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

गंभीर दुखापत झालेल्या विल्यमसनसाठी हा विश्वचषक खेळणे कठीण दिसत होते. पण या खेळाडूने फिट होण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि विश्वचषक संघात स्थान मिळवले. विल्यमसन व्यतिरिक्त, टीम साउथी हा या संघातील एकमेव खेळाडू आहे जो 2011 च्या भारतातील विश्वचषक संघाचा भाग होता. याशिवाय किवींच्या संघात सहा खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहेत. दरम्यान, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबर सुरुवात होईल. (New Zealand Squad ODI World Cup)

फिन ॲलनला वगळले

सलामीवीर फलंदाज फिन ॲलनला संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, भारतीय वंशाचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू रचिन रवींद्र संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. रवींद्रने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. एवढेच नाही तर हाँगकाँगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या मार्क चॅपमनचीही निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज काईल जेम्सन आणि अॅडम मिल्ने तसेच यष्टीरक्षक टिम सेफर्ट यांना डच्चू देण्यात आला आहे. (New Zealand Squad ODI World Cup)

मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स हे चार खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच वनडे विश्वचषक खेळणार आहेत. हे खेळाडू यापूर्वी टी-20 विश्वचषक संघाचा भाग राहिले आहेत. अष्टपैलू रचिन रवींद्र आणि फलंदाज विल यंग हे दोन खेळाडू आहेत जे न्यूझीलंडकडून प्रथमच कोणत्याही फॉरमॅटमध्ये विश्वचषक खेळतील. इश सोधी आणि मिचेल सँटनर हे फिरकीपटू संघात स्थान पक्के करण्यात यशस्वी ठरले आहेत.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला देखील न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे, ज्याने आपल्या 100 व्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध घातक गोलंदाजी केली आणि 3 बळी घेतले. त्याला वेगवान आक्रमणात मॅट हेन्रीची साथ मिळणार आहे. टॉम लॅथमला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तो सध्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत किवी संघाचे नेतृत्व करत आहे. (New Zealand Squad ODI World Cup)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news