आता हवाई सफर करतानाही प्रियजनांशी मारा गप्पा

आता हवाई सफर करतानाही प्रियजनांशी मारा गप्पा
Published on
Updated on

लंडन : विमानातून प्रवास करताना स्मार्टफोन एअरप्लेन मोडमध्ये टाकणे आपल्या सवयीचे झाले आहे. कारण, एकदा फोन एअरप्लेन मोडमध्ये टाकला की जगाशी आपला संपर्क तुटतो. आता विमान सफर करतानाही तुम्हाला फोनवर बोलता येईल. युरोपियन युनियनने यासंदर्भात परवानगी दिली आहे.

एअरलाईन्स कंपन्या प्रवाशांना 5जी तंत्रज्ञानाचा उपयोग करून फोनची सुविधा देऊ शकतात. कमी गतीच्या मोबाईल डेटाच्या माध्यमातूनही विमान सफर करताना संपर्क करता येऊ शकेल. प्रवाशांना विमानातून प्रवास करताना फोन एअरप्लेन मोडमध्ये टाकायची आवश्यकता नाही. तथापि, याची नेमकी अंमलबजावणी कशी होणार याबाबत अजून स्पष्टता नाही. विमानात 5जी फ्रिक्वेंसी उपलब्ध करून देण्याची तारीख 30 जून 2023 आहे.

अशी सेवा उपलब्ध झाली तर प्रवाशी विमानातून जाताना कॉल करू शकतील आणि कॉल घेऊ शकतील. एवढेच नव्हे तर लाईव्ह स्ट्रीमिंगचाही आस्वाद घेऊ शकतील. थोडक्यात सांगायचे तर आता आकाशात असताना इंटरनेटविना राहावे लागण्याची गरजच नाही.

या सेवेमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सेवासुविधा मिळू शकतील. सध्या ही सुविधा युरोपपुरती सीमित राहणार असली तरी नंतरच्या काळात ती आपल्याकडेही येईल यात शंका नाही. यातील आणखी एक मुद्दा म्हणजे 5 जी तंत्रज्ञानच्या माध्यमातून लहरी विमान यंत्रणेत व्यत्यय आणू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तशी कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
विमानाच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देऊन काळजी घेऊनच ही यंत्रणा राबवली जाईल, असा निर्वाळा युरोपियन युनियनने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news