मोबाईल फोन, लॅपटॉपच नव्हे, फ्रीज, मिक्सरमधूनही हेरगिरी!

मोबाईल फोन, लॅपटॉपच नव्हे, फ्रीज, मिक्सरमधूनही हेरगिरी!

Published on

लंडन : वृत्तसंस्था : मेड इन चायना मोबाईल फोन, लॅपटॉपच्या माध्यमातून चीन हेरगिरी करतो, माहिती लांबवितो असे प्रकार यापूर्वी समोर आलेले आहेत. आता फ्रीज, मिक्सर आदी मेड इन चायना घरगुती वस्तूंच्या माध्यमातूनही चीनने आपली हेरगिरी चालविल्याचे समोर आले आहे. फ्रीज, मिक्सरसारख्या उपकरणांमध्ये मायक्रोचिप बसवून चीन हे उद्योग करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनमधील लोकांची खासगी माहिती चुटकीसरशी चीनला उपलब्ध होऊ शकते. या कामासाठी चीनने गुप्तहेर नेमले नाहीत की आणखी काही नाही. फ्रीज, लॅपटॉप, मोबाईल किंवा मिक्सर-ग्राईंडरसारख्या वस्तूंत बसवलेल्या मायक्रोचिपच्या माध्यमातून चीन लोकांची खासगी माहिती लांबवत असल्याचे ब्रिटिश सरकारच्या दीर्घकाळ चाललेल्या सूक्ष्म चौकशीअंती समोर आले आहे. कारमधील चिनी पार्टस्मध्येही ही चिप बसविण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये उघडकीला आले होते. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला ब्रिटनने वेग दिला होता. चीनचा अजिबात भरवसा नाही. चीन आपल्या एलईडी बल्बमध्येही हेरगिरीचे यंत्र घालून ते जगाला विकू शकतो, असे ब्रिटिश सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या अनेक विद्यापीठांनी चिनी कंपन्यांसोबत तंत्रज्ञानविषयक करार केले आहेत. या विद्यापीठातील संशोधनाची माहितीही चिनी कंपन्या चोरी करत असल्याची ब्रिटनला शंका आहे. या कंपन्यांनी आफ्रिकन देशांमध्ये हेरगिरी केल्याचा आरोपही यापूर्वी झाला होता.

चीनची चिंता का म्हणून?

  • क्वेक्टेल, फायबोकॉम आणि चायना मोबाईल या चीनच्या केवळ तीन कंपन्यांचा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या जागतिक बाजारपेठेतील वाटा 54 टक्के आहे.
  • जगातील 10 बड्या लॅपटॉप कंपन्या याच तीन कंपन्यांनी तयार केलेले सुटे भाग वापरतात. दळणवळणाशी संबंधित उद्योगांतही या 3 कंपन्यांचा जागतिक बाजारपेठेतील वाटा 75 टक्के आहे.
  • चीनमधील या तिन्ही कंपन्या चीन सरकारचे नियंत्रणाखाली आहेत. लन मस्क यांच्या टेस्लासारखी बडी कार कंपनीही कनेक्टिव्हिटीसाठी याच कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करतात.

या उपकरणांतून चिनी हेरगिरी

लॅपटॉप, व्हॉईस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर, स्मार्ट वॉच, स्मार्ट एनर्जी मीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, जगभरात पोलिस यंत्रणेत वापरले जाणारे कॅमेरे, डोअरबेल कॅमरे, कार्ड पेमेंट मशीन, हॉट टब, कार आदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news