Elvish Yadav case : नोएडा पोलिसांनी आणखी २ संशयित आरोपींना केली अटक
पुढारी ऑनलाईन डेस्क : रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवल्याबद्दल पोलिसांनी बिग बॉस ओटीटी विनर, यु-ट्यूबर एल्विशला आधीच अटक केली आहे. आता या प्रकरणी दोन संशयित आरोपींनी नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. (Elvish Yadav case) ईश्वर आणि विनय अशा दोन संशियत आरोपींची नावे आहेत, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. (Elvish Yadav case)
एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी १७ मार्च रोजी अटक केली होती. तो सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोपावरून त्याची चौकशी सुरू आहे. नोएडा पोलिसांनी आता एल्विशच्या मोबाईल फोनची तपासणी केली आहे. सोशल मीडिया खात्यांवरील त्याचे चॅट्स डीकोड करण्यात येत आहेत.
पोलिसांनी पार्टी ग्रुप्ससाठी त्याचे व्हॉट्सॲप अकाऊंट देखील तपासले आहे. पोलिसांनी या कामात फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. नोएडा पोलिसांनी एक यादी तयार केली आहे, ज्यामध्ये त्या लोकांची नावे आहेत ज्यांच्याशी एल्विश या पार्ट्यांमध्ये संपर्कात होता. यादीत ज्यांची नावे आहेत त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. आतापर्यंत या प्रकरणात गायक फाजिलपुरियाशिवाय कोणत्याही सेलिब्रिटीचे नाव समोर आलेले नाही. नुकतेच ईश्वर आणि विनय या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

