पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: निम्म्या शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: निम्म्या शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
Published on
Updated on

पुणे : पर्वती, एसएनडीटी आणि वानवडी येथे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून फ्लो मीटर बसविण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे निम्म्या शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 15) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीतील वानवडी ईएसआर व हाय सर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील पर्वती एचएलआर आणि एसएनडीटी एसएलआर येथे फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. त्यामुळे पर्वती, बिबवेवाडी, सहकारनगर, शिवाजीनगर, कोथरूड, सेनापती बापट रस्ता यासह निम्या शहराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्रीपासून व गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहे.

वानवडी-ईएसआर व हाय सर्व्हिस : वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी.टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर. पर्वती एचएलआर : पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्शनगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एसबीआय कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर- बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, एसटी कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर धनकवडी (चव्हाणनगर), सेमिनरी जीएसआर : अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरीनगर, कोंढवा गावठाण, स.नं. 354, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स.नं. 42,43, युनिटी पार्क, ज्ञानेश्वरनगर, सवेरा पार्क परिसर.

एसएनडीटी (एचएलआर) : शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड, बी.एम.सी.सी. रोड, रेव्हेन्यू कॉलनी, गोखलेनगर, मॉर्डन कॉलनी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापती बापट रोड, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, तेजसनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, सुतार दवाखान्या मागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडियल कॉलनी, गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानीनगर, किष्किंधानगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर, प्रभाग 31 चा वडार वस्ती, स्टेट बँक नगर, हैप्पी कॉलनी, पृथ्वी हॉटेल परिसर, मेघदूत सोसायटी. या सर्व परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकानी जपून पाणी वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news