पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: निम्म्या शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: निम्म्या शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच. एल. आर टाकी परिसर, तसेच नवीन जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपिंग, कोंढवे धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे असल्याने येत्या गुरुवारी (दि.. १) पश्चिम व उत्तर शहराचा पाणीप रवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग असा

चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटिन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतिवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रस्ता आणि परिसर.

गांधी भवन टाकी परिसर: कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल न्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी. स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोटड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क- १. आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतिवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रिमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई- पुणे बायपास रोड दोन्ही बाजू शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम सीन, कर्वेनगर गावठाण तपोधाम परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

पॅनकार्ड क्लब टाकी: बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर.

वारजे जीएसआर टाकी: कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११. इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०.

एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, जानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, वैदूवाडी, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, संगमवाडी.

कोये धावडे जलकेंद्र: वारजे हायवे परिसर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यू कोपरे

होळकर जलकेंद्र पंपिंग भाग: मुळा रोड, खडकी कॅन्टॉन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएच एच ई फॅक्टरी परिसर, हरिगंगा सोसायटी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news