No-confidence motion: विरोधक मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत; सूत्रांची माहिती

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: मणिपूर हिंसाचाराची देशभर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहातही मणिपूरच्या मुद्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. दरम्यान बुधवारी (२६ जुलै) विरोधक मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव (No-confidence motion) आणणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, मणिपूरच्या मुद्यावरून वारंवार सभागृह तहकुब केले जात आहे. पीएम मोदी यांनी मणिपूर मुद्यावर आपले मौन सोडून या मुद्यावर संसदेत बोलावे या मागणीर विरोधक ठाम आहेत. तर गृहमंत्री अमित शहा मणिपूर मुद्यावर सभागृहात बोलतील असे सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरू आहे.

No-confidence motion: मोदी सरकारविरोधी प्रथम अविश्वास प्रस्ताव कधी?

मिळालेल्या माहितीनुसार, संसदेत आतापर्यंत 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. ज्यामध्ये जुलै 2018 मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र मोदी सरकारने यावेळी बहुमत सिद्ध केले.

पीएम मोदी यांची विरोधकांच्या इंडिया युतीवर टीका

मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधी पक्षाच्या भारत या नव्या नावावरही त्यांनी खिल्ली उडवली. भारत हे नाव ठेवून काहीही साध्य होत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. इंडियन मुजाहिदीनच्या नावानेही भारताचा उल्लेख केला जातो. पीएफआय आणि आयएनसीच्या नावानेही भारताचा उल्लेख केला जातो, असे मोदी म्हणाले.

पवन खेडा यांनी दिले प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पलटवार केला आहे. खेरा म्हणाले, 'मोदीजी, तुम्ही काँग्रेसच्या विरोधात इतके आंधळे झालेत की तुम्ही भारताचाच द्वेष करू लागलात. आज निराश होऊन तुम्ही भारतावरच हल्ला केल्याचे मी ऐकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news