

पुढारी वृत्तसेवा : निळवंडे कालव्याच्या प्रकल्पाच लोकार्पण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निळवंडे प्रकल्पाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या भाषणात ते म्हणतात, 'पंतप्रधान मोदी यांनीच 2017 साली साईभूमीत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले होते. आज त्याच कामांचे उद्घाटन मोदींच्याच हस्ते होत आहे. शिर्डीत जगभरातून साईभक्त येतात. त्यांच्यासाठी सुविधा व समाजउपयोगी उपक्रमाचें लोकार्पण आज केले गेले. निळवंडे सारखा प्रकल्प माझ्या जन्मापूर्वी सुरू होता. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यांचे उद्घाटन होत आहे. या प्रकल्पासाठी 2016-17 मध्ये निधी दिला. चालना दिली. विखे- पिचड विरोधात होते, तरीही त्यांनी सहकार्य केले. 9 वर्षात 30 हजार कोटी सिंचनासाठी दिले. मोदी प्रेरणा घेत शेतकर्यांना 6 हजार नमो किसान सन्मान निधी सुरू केला. मोदींच्या हस्ते त्याची सुरूवात होत आहे.
मी मोदीजींनया विनंती करतो की, महाराष्ट्रातील 50 टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. पाणी नाही, पाऊस नाही. येथे पाणी नाही पोहचत तोपर्यंत आत्महत्या कलंक पुसणार नाही. मोदीजी आपल्या नेतृत्वातच हे होऊ शकेल. पश्चिम वाहिनी पाणी समुद्रात जाणारे पाणी गोदावरीत आणून राज्य सुजलाम सुफलम करू शकतो. याबाबतचा आराखडा तयार केला आहे. वैनगंगातून समुद्राला जाणारे पाणी नळगंगात आणू शकतो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू शकतो. येणारी पिढी दुष्काळ नाही पाहणार यासाठी आशिर्वाद द्या. आज मोदीजी या कार्यक्रमांसाठी आले, वेळ दिला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो.