

पुढारी ऑनलाइन न्यूज डेस्क : Nigeria Violence : नायजेरियात सोमवारपासून तेथील पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. या दोन गटात झालेल्या हिंसाचारात किमान 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत, असे वृत्त एएफपी न्यूजने दिले आहे. एएफपी न्यूजच्या हवाल्याने एएनआयने याचे वृत्त दिले आहे.
नायजेरियातील पठारी राज्यातील मंगू जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पशुपालक आणि शेतकरी गटात सोमवारी हिंसाचाराचा उद्रेक झाला. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला. सोमवारपासून हा संघर्ष सुरूच आहे. हिंसाचारामुळे शेकडो लोक घरे सोडून पळून जात आहेत. आतापर्यंत हजारो लोक विस्थापित झाले आहेत. ज्या भागात हिंसाचार झाला आहे. तिथे गेल्या अनेक वर्षांपासून वांशिक आणि धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणात आहे. तसेच यापूर्वीही तिथे अशा प्रकारचे टोळी युद्ध झाले आहे. यामध्ये अनेकदा लोकांचा जीव जातो. मात्र, सध्या जो हिंसाचाराचा उद्रेक झाला त्यामागील कारण समोर आलेले नाही. अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. Nigeria Violence
दरम्यान, सोमवारपासून उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत किमान 85 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती स्थानिक सरकारी काउंसिलचे अध्यक्ष दापूत, मंत्री डॅनीयल यांनी एएफपीला दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार त्यांना आतापर्यंत 85 मृतदेह सापडले आहेत. तर स्थानिक Mwaghavul विकास संघटनेचे एक समुदाय नेते जोसेफ ग्वांकट यांनीही याला दुजोरा दिला आहे. शोध आणि बचाव पथकाने "85 मृतदेह शोधून काढले," त्यांनी एएफपीला सांगितले.
नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (NEMA) ने सांगितले की, हिंसाचारामुळे हजारो लोक विस्थापित झाले आणि शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. "आम्हाला एकूण 3,683 (लोक) विस्थापित झाले आहेत," एनईएमएचे प्रादेशिक समन्वयक यूजीन नायलॉन्ग यांनी एएफपीला सांगितले की, आपत्कालीन मदत गरजूंपर्यंत पोहोचली आहे. 720 हून अधिक घरे एकतर अंशतः किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असेही ते म्हणाले.
समुदायाचे नेते ग्वांकट यांनी सांगितले की, 57 जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर NEMA मधील Nyelong यांनी सांगितले की हल्ल्यात अंदाजे 216 लोक जखमी झाले आहेत.
राज्य आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी (सेमा), ने बुधवारी या भागाला भेट दिली, त्यांनी परिस्थिती भयानक असल्याचे वर्णन केले. "आम्ही अजूनही जळत असलेली घरे पाहू शकतो. आम्ही पुढे जाऊ शकलो नाही कारण () तरुण रागावले होते," अशी माहिती SEMA चे शोध आणि बचाव संचालक जुनी बाला यांनी एएफपीला सांगितले.
ते पुढे म्हणाले "जमिनीवरील परिस्थिती खूपच वाईट आहे. हजारोंच्या संख्येने मुले आणि महिला रस्त्यावरून जात आहेत," तो म्हणाला. "त्यांना निवारा, अन्न, अंथरूण, इत्यादी वस्तूंची गरज आहे."
दरम्यान, हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिस प्रवक्ते अल्फ्रेड अलाबो यांनी सांगितले की, "भारी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे." आतापर्यंत सामान्य भागात शांतता पुनर्संचयित केली गेली आहे."
हे ही वाचा :