Nifty and Sensex : अर्थवार्ता

Stock Market
Stock Market
Published on
Updated on

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांक आपल्या उच्चतम पातळीपासून काही प्रमाणात खाली आले. निफ्टी व सेन्सेक्समध्ये (Nifty and Sensex) अनुक्रमे 223.65 अंक व 448.33 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 18114.9 अंक व 60821.62 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्समध्ये 1.22 टक्के व 0.79 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. गुंतवणूकदरांनी गतसप्ताहात काही प्रमाणात नफा वसुलीला प्राधान्य दिल्याने निर्देशांकात घसरण.

* सरकारी बँकांसाठी खुशखबर. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत केंद्र सरकार सरकारी बँकांमध्ये भांडवली गुंतवणूक करणार. 2021-22 सालाच्या बजेटमध्ये सरकारी बँकांमध्ये 20 हजार कोटींची घोषणा करण्यात आली होती. यावर्षी 12 सरकारी बँकांनी नफा जाहीर केला. ताळेबंद सुधारण्याच्या द़ृष्टीने सरकारतर्फे हा निर्णय घेण्याची शक्यता. (Nifty and Sensex)

* देशातील सर्वांत मोठी कंपनी रिलायन्सचे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा एकूण नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 43 टक्के वधारून 13,680 कोटी झाला. तर महसूल 50.7 टक्के वधारून 167,611 कोटी झाला. यामधील रिलायन्स जिओचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 2.11 टक्के वधारून 3728 कोटी झाला. तसेच कंपनीची अजून एक उपशाखा असलेल्या रिलायन्स रिटेलची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 10.5 टक्के वधारून 45,426 कोटी झाली. आणि कंपनीचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 45.2 टक्के वाढून 2913 कोटी झाले.

* डिजिटल पेमेंट क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी 'पेटीएम' लवकरच भांडवल बाजारात (शेअर मार्केटमध्ये) उतरणार. एकूण 16,600 कोटींच्या आयपीओच्या प्रस्तावास बाजार नियंत्रक 'सेबी'ची मान्यता. नोंदणीपश्चात पेटीएमचे बाजारमूल्य सुमारे 1.47 ते 1.78 लाख कोटींच्या दरम्यान राहण्याची शक्यता. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार पेटीएमचे समभागमूल्य सध्या 2950 रुपये प्रतिसमभागपर्यंत असू शकेल.

* केंद्र सरकारकडून व्होडाफोन-आयडियाला एजीआर ड्यूज (थकीत कर) भरण्यासाठी 4 वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली. कंपनीकडून देखील प्रस्तावाचा स्वीकार. यामुळे कंपनीवरचा वर्षाला 23 हजार कोटींचा करांचा भार हलका होणार. एकूण 92 हजार कोटी चार वर्षात भरावे लागणार होते. या निर्णयामुळे त्यामध्ये सवलत मिळणार.

* बँक ऑफ महाराष्ट्राचे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. मागील वर्षीच्या तुलनेत नफा 102.71 टक्के वधारून 264 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 33.84 टक्के वधारून 1120 कोटींवरून 1500 कोटींवर तसेच नेट इंटरेस्ट मार्जिन 2.3 टक्क्यांवरून 3.27 टक्क्यांवर. बँकेचे एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 8.81 टक्क्यांवरून 5.56 टक्के झाले.

* आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था 'मूडीज' ते भारतीय बँकिंग क्षेत्राचे पतमानांकन वाढवून स्टेबल असे केले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर 9.3 टक्के आणि त्यापुढील वर्षात 7.9 टक्के असेल, असा अंदाजदेखील वर्तवला. तसेच कर्जाची मागणी सरासरी 10 ते 13 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली.

* देशातील महत्त्वाची एफएमसीजी कंपनी 'एचयूएल' (हिंदुस्थान युनिलिव्हर)चा नफा दुसर्‍या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 9 टक्के वधारून 2187 कोटी झाला. तसेच विक्री 11 टक्के वाढून 12516 कोटी झाली. याच क्षेत्रातील दुसरी प्रतिस्पर्धी कंपनी 'नेस्ले इंडिया'चा नफा 5.15 टक्के वाढून 617.37 कोटी झाला. विक्रीमध्ये 9.63 टक्क्यांची वाढ होऊन 3864.97 कोटी झाली.

* सरकारी कंपनी 'एलआयसी'मध्ये लवकरच 20 टक्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता मिळणार. मार्च 2022 पर्यंत एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील. सरकार आयपीओद्वारे 10 टक्के हिस्सेदारी विकणार. नोंदणीपश्चात एलआयसीचे मूल्य 8 ते 11.5 लाख कोटींच्या दरम्यान होण्याचा तज्ञांचा अंदाज. सरकारने यामध्ये 10 टक्के हिस्सा विकल्यास सरकारला 80 हजार कोटी ते 1 लाख कोटी मिळण्याची शक्यता. यावर्षी सरकारने पावणेदोन लाख कोटींच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

* 'एनटीपीसी'चा टाटा पॉवरला करार रद्द करण्याचा इशारा. राजस्थानमधील जैसलमेर येथे 320 मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम टाटा पॉवरकडे आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत हा प्रकल्प बांधून पुरा होणे अपेक्षित आहे. एकूण 1200 कोटींचा प्रकल्प असून आठ महिन्यांपासून कामात कोणतीही प्रगती नसल्याने एनटीपीसी रिन्युएबल एनर्जीच्या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

* येस बँकेचे दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. निव्वळ नफ्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 74 टक्के वाढ होऊन नफा 225 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न 23 टक्के घटून 1512 कोटी झाले. तसेच इतर उत्पन्नात 30 टक्क्यांची वाढ होऊन हे उत्पन्न 778 कोटी झाले. तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्स)65 टक्क्यांची घट होऊन 377 कोटींपर्यंत खाली आल्या.

* जेएसडब्लू स्टीलचा आतापर्यंतचा विक्रमी नफा जाहीर. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीअखेर नफा मागील वर्षी असणार्‍या 1595 कोटींच्या तुलनेत तब्बल 7179 कोटी झाला. महसूलदेखील 19264 कोटींवरून थेट 32503 कोटींपर्यंत पोहोचला.

* मुंबई उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार 'झी' गुंतवणूकदारांची बैठक घेण्यास तयार. यापूर्वी इन्व्हेस्को या 'झी'मधील प्रमुख गुंतवणूकदाराने बैठक बोलावण्याची मागणी केली होती. परंतु इन्व्हेस्कोच्या पडद्याआडून स्पर्धक कंपनी 'झी'वर नियंत्रण मिळवायच्या प्रयत्नात असल्याचा 'झी'चा आरोप. परंतु गुंतवणूकदारांच्या बैठकीत काहीही निर्णय लागला तरी त्याला एका आठवड्यासाठी स्थगिती देण्याचा विश्वास उच्च न्यायालयाने झी कंपनीला दिला.

* भारताची परकीय गंगाजळी 15 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात 1.492 अब्ज डॉलर्सनी वधारून 641.008 अब्ज डॉलर्स झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news