NIA चे पंजाबसह 8 राज्यात 70 हून अधिक ठिकाणी छापे

NIA चे पंजाबसह 8 राज्यात 70 हून अधिक ठिकाणी छापे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : NIA ने देशभरात 70 ठिकाणी छापे टाकत आहेत. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, चंदीगढ, उत्तरप्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये NIA ने 70 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. गुन्हेगारीच्या सिंडिकेट विरुद्ध NIA ने नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात तसेच टेरर फंडिंग आणि शस्त्र पुरवठा संबंधात एनआयएने आज मंगळवारी सकाळी आठ राज्यांमध्ये 72 ठिकाणी छापे टाकले आहेत.

पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये एकट्या पंजाबमध्ये ३० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. गुंडगिरी आणि दहशतवादाच्या फंडिंग प्रकरणी Gangster Case & Terror Funding एनआयने ही मोठी कारवाई केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने यापूर्वी नोंदवलेल्या (Gangster Case & Terror Funding) गुन्हेगारी सिंडिकेटविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भाने हे छापे टाकले जात आहेत. गुंडांच्या नेटवर्कवर एनआयएचा हा चौथा छापा आहे. सध्या एनआयएचे अधिकारी याबाबत तपशीलवार माहिती शेअर करत नाहीत. या छाप्यापूर्वीही एनआयएने दोनदा गँगस्टर सिंडिकेटवर कारवाई केली आहे. एनआयने देशात अवैध शस्त्रास्त्रांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. यामुळेच पंजाब, हरियाणा आणि राजस्थान व्यतिरिक्त एनआयए यावेळी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही पोहोचले आहे. जिथून पुढे शस्त्रे गुंडांपर्यंत पोहोचतात.

पंजाबमध्ये कॅनडामध्ये बसून दहशत पसरवणाऱ्या लखबीर लांडा आणि गँगस्टर लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्या जवळच्या साथीदारांवर एनआयएने छापे टाकले आहेत. काही दिवसांपूर्वी लखबीर लांडा याला एनआयएने दहशतवादी घोषित केले असून त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर सतत नजर ठेवण्यात येत होती. त्यानंतर एनआयएने तरनतारन, फिरोजपूर आणि माळव्यातील काही शहरांमध्ये छापे टाकले आहेत. (Gangster Case & Terror Funding)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news