Newton mysterious death : न्यूटनचे व्यक्तिमत्त्व आणि मृत्यूही रहस्यमय!

Newton mysterious death
Newton mysterious death
Published on
Updated on

लंडन : सर आयझॅक न्यूटन यांना जगातील सार्वकालिक महान वैज्ञानिक आणि गणितज्ज्ञ मानले जाते. विज्ञान व गणित विषयात त्यांनी अतुलनीय योगदान दिलेले आहे. न्यूटन यांचे व्यक्तिमत्त्व गूढ होते. (Newton mysterious death) शिवाय मृत्यूनंतर त्यांच्या शरीरात पार्‍याचे अधिक प्रमाण आढळल्याने त्यांचा मृत्यूही तसाच रहस्यमय बनलेला आहे.

न्यूटन यांनी जगाला दिलेले अनेक सिद्धांत आजही गणित आणि विज्ञानातील मूलभूत सिद्धांतांपैकी मानले जातात. त्यांचे काही समकालीन वैज्ञानिकांशी मतभेदही होते असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबतही उलटसुलट बोलले जात असते. न्यूटन (Newton mysterious death) यांचे 31 मार्च 1727 मध्ये बि—टनच्या मिडलसेक्समधील केन्सिंग्टन येथे निधन झाले. एक गणितज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, धर्म आणि अध्यात्माचे अभ्यासक, अल्केमिस्ट अशा विविध प्रकारचे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांच्या कॅल्क्युलसच्या सिद्धांताने गणिताला नवा आधार दिला. सध्या इंजिनिअरिंगची कॅल्क्युलसशिवाय कल्पनाही करता येत नाही.

मात्र, कॅल्क्युलसचा शोध प्रथम कुणी लावला याबाबत वाद आहेत. त्याचे श्रेय न्यूटनला द्यावे की लेबिनिट्जला याबाबत अनेक विद्वानांमध्ये मतभेद आहेत. अर्थात दोघांनीही स्वतंत्र रूपाने याबाबत संशोधन केले होते. (Newton mysterious death) मात्र, इंग्रजी अधिक व्यापक भाषा असल्याने न्यूटनला सर्वप्रथम स्वीकृती मिळाली. न्यूटनच्या आधीच लेबनिट्ज यांनी कॅल्क्युलस बनवले होते व ते जगासमोर येण्यास वेळ लागला असे म्हटले जाते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने जगासमोर आणला असला तरी पृथ्वीच्या आकर्षणशक्तीची माहिती प्राचीन भारतीयांना होती असे अनेक प्राचीन ग्रंथांवरून स्पष्टपणे समजून येते.

सातव्या शतकातील ब्रह्मगप्त या महान खगोलशास्त्रज्ञांनी न्यूटनच्या (Newton mysterious death) आधी एक हजार वर्षे पृथ्वीच्या गुरुत्वार्षण शक्तीविषयीची माहिती दिली होती. खरे तर ब्रह्मगुप्त यांच्या आधीच म्हणजेच सहाव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहिर यांनाही या आकर्षणशक्तीची माहिती होती; पण त्यांनी त्याला विशिष्ट नाव दिले नव्हते. अकराव्या शतकातील भास्कराचार्यांसारख्या विद्वानांनीही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे वर्णन केलेले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news