

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश… जगातील सर्वांत वैविध्यपूर्ण देश… भारताच्या सार्वभौमत्वाचे दिमाखदार प्रतीक ठरेल, अशीच इमारत देशाच्या संसदेसाठी असावी, ही संकल्पना 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कागदावर मांडली… आणि त्यांच्याच कार्यकाळात आज लोकशाहीच्या या सार्वभौम मंदिराचे उद्घाटन होत आहे. पंतप्रधान मोदी संसदेची नवीन वास्तू आज देशाला समर्पित करणार आहेत. नव्या संसद भवनाचा हा महासोहळा सध्या सुरू आहे.
आज पंतप्रधान मोदी संसदेची नवीन वास्तू देशाला समर्पित करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात यावेळी उपस्थित राहणार आहेत. दोन सत्रांत उद्घाटन सोहळा होणार आहे.