

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या इलेक्ट्रिक शिवनेरी बस पुणे दादर मार्गावर शुक्रवारी सकाळी सव्वा पाच वाजल्यापासून धावायला सुरुवात झाली. एसटीच्या ताफ्यात नुकत्याच दहा इलेक्ट्रिक शिवनेरी बस दाखल झाले आहेत. त्या आज (दि.19) पासून पुणे स्टेशन येथून दादर करीता धावण्यास सुरुवात झाली आहे. यात इलेक्ट्रिक शिवनेरी पुणे विभागास 5 तर मुंबई विभागास 5 ई -शिवनेरी बस मिळाल्याने देण्यात आल्या आहेत.
या 10 ई -शिवनेरी बसद्वारे दिवसभरात 15 फेऱ्या पुणे स्टेशन येथून दादर करता सुटतील व दादर येथून पुणे स्टेशन करता 15 फेऱ्या सुटतील. या फेऱ्या औंध मार्गे व निगडी मार्गे दर तासाला उपलब्ध राहतील. तिचे दर वातानुकूलित शिवनेरी प्रमाणे असणार आहेत. पुणे स्टेशन येथील स्थानकात एसटीच्या अधिकाऱ्यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेता येईल. प्रवाश्यानी या बस सेवेचा लाभ घ्याव्या. असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.