

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञानी वर्तवली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा आतापर्यंत ५९ देशांमध्ये प्रसार झाला आहे. दरम्यान भारतात कोरोनाच्या रुग्णामध्ये अचानक वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (India New Corona Variant)
जागतीक आरोग्य संघटनेच्या आशियाई रिजनल डायरेक्टर डॉक्टर पूनम खेत्रपाल यांनी भारतातील कोरोनाबाबत शंका व्यक्त केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे देशातील स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. याची आपण योग्य काळजी घेणे काळाची गरज आहे.
महामारीचा धोका अजूनही कायम आहे. जागतिक स्तरावर ओमायक्रॉनमुळे जगाच्या इतर भागांमध्ये वाढत्या हाहाकार माजण्यास सुरूवात झाली आहे.
डब्ल्यूएचओच्या अधिकारी पूनम खेत्रपाल म्हणाल्या की, दक्षिण आशिया प्रदेशात आपल्याला गाफील राहून चालणार नाही कोरोनाच्या प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार करण्याची गरज आहे. सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना मजबूत करणे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशातील पाच राज्यांना त्याचा फटका बसला आहे. मास्कचा वापर टाळणे आणि लसीकरणास होणारा विलंब याविरुद्ध सरकारने काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
ओमायक्रॉनला थांबवण्यासाठी जगभरातील देश नवीन निर्बंध घालत आहेत. डॉ खेत्रपाल म्हणाल्या की, ओमायक्रॉनचा जागतिक प्रसार आणि देशात वाढणाऱ्या रुग्णावर लवकरच नियमावली बसवण्यात आली आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे स्पष्ट चित्र तयार करणे कठीण आहे.
WHO ने देशांना अधिकाधिक डेटा सबमिट करण्यास सांगितले आहे.
डेटाचे विश्लेषण करण्यासाठी हजारो तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.