

पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल मृत्यू झाला. प्रभाकर साईलचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल प्रभाकर साईल याचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईसह बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडून 25 लाखांची खंडणी वसूलीचा गंभीर आरोप करणार्या पंच प्रभाकर साईल याची एनसीबीच्या ऑपरेशन विभागाने याआधी चौकशी केली होती. एनसीबी मुंबईने दाखल केलेले गुन्हे आणि केलेल्या कारवाईवर वेगवेगळ्या व्यक्ती आणि स्तरांतून आरोप करण्यात आले होते.