file photo
राष्ट्रीय
२६ जानेवारीपासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान
कठुआ; वृत्तसंस्था : काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणार असून हे अभियान २६ मार्चपर्यंत म्हणजेच दोन महिने चालणार असल्याची माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, काँग्रेस कार्यकर्ते घराघरांत जाऊन प्रचार करणार असून ६ लाख गावे आणि २ लाख ५० हजार ग्रामपंचायतीतील १० लाख मतदारसंघातील प्रत्येक घरात कार्यकर्ते पोहोचणार आहेत. खासदार राहुल गांधी कार्यकर्त्यांना पत्र पाठवणार आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून पक्ष सामान्य जनतेशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.

