नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजधानी एक्स्प्रेसला विलंब व्हावा म्हणून गाडीत बॉम्ब ठेवल्याचा फोन करणार्या हवाई दलाच्या सार्जंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. या सार्जंटला राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यातच अटक करण्यात आली तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वाचारच्या सुमारास दिल्ली स्थानकावर एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणार्याने दिल्लीहून मुंबईला जाणार्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देत फोन कट केला. यानंतर पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आलेल्या फोनचे लोकेशन शोधत एका व्यक्तीला राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यातच अटक केली. त्याचे नाव सुनील संगवान असून तो हवाई दलात सार्जंट असून मुंबईत सांताक्रुझ येथे तो सेवेत आहे. कसून चौकशीनंतर त्याने सांगितले की, आपण दारू पित बसलो होतो. त्यामुळे गाडी लेट व्हावी म्हणून बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .