

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयातून सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 17 जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटमधून ही माहिती दिली. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचलनालय त्यांची चौकशी करणार असून 23 जून रोजी उपस्थित राहण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले आहेत. यापूर्वी ईडीने या प्रकरणात राहुल गांधी यांची चारवेळा चौकशी केली आहे.
हेही वाचा