राजकोट टीआरपी मॉलचा गेम झोन खाक; 27 ठार

राजकोट टीआरपी मॉलचा गेम झोन खाक; 27 ठार
Published on
Updated on

राजकोट (गुजरात) : वृत्तसंस्था : गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रस्त्यावरील टीआरपी मॉलमधील गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागून त्यात 12 लहान मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी 'डीएनए' टेस्ट केली जाणार आहे. आग लागल्यानंतर 10 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले. गेम झोन पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नेमके किती लोक आत अडकले आहेत, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. बचाव कार्यात मृतदेह काढले जात आहेत, तसा मृतांचा आकडा वाढत आहे.

गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लाय व लाकडाचे तुकडे पसरलेले होते. उपस्थित कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. अवघ्या 30 सेकंदांत आग संपूर्ण गेम झोनमध्ये पसरली. पेट्रोल आणि डिझेलचे डबेही होते, ते लोक काढू लागले. मागच्या बाजूला गॅस सिलिंडरही ठेवले होते. मॉलमध्ये दोन मजले गेम झोनचे आहेत.

सर्व गेम झोन बंद

राजकोटचे सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गेमिंग झोनचे ऑडिट केले जाईल. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news