बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या जेएनयूतील विद्यार्थ्यांवर दगडफेक

बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या जेएनयूतील विद्यार्थ्यांवर दगडफेक

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  बंदी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर अज्ञातांनी दगडफेक केली. बंदीचे समर्थन करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांचे सुपुत्र अनिल अँटनी यांनी बुधवारी सकाळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, डॉक्युमेंटरीवरील बंदीचे समर्थन करणारे माझे ट्विट काँग्रेस पक्षाने डिलिट करण्यास सांगितले; मात्र मी राजीनामा देण्यास नकार दिला. हुजरेगीरी योग्यतेचा मापदंड झाला आहे. अनिल अँटनी यांनी मंगळवारी दुपारी ट्विट केले होते. भारतीय संस्थांच्या बाबत बीबीसीने मांडलेले विचार हे देशाचे सार्वभौमत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे, असे ट्विट केले होते.  दरम्यान जेएनयूमध्ये मंगळवारी उशिरा रात्री बीबीसीची डॉक्युमेटरी बघणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली.

ही दगडफेक कुणी केली हे समजू शकले नाही. अज्ञात लोक अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले. दरम्यान यापूर्वी विद्यार्थी संघ कार्यालयातील वीज पुरवठा आणि इंटरनेट मंगळवारी बंद करण्यात आला होता. मात्र मंगळवारी उशिरा रात्री वीज आणि इंटरनेट पुन्हा सुरू करण्यात आहे. या प्रकरणी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अनिल अँटोनी म्हणाले, भलेही आमच्यात अंतर्गत मतभेद असतील मात्र त्याचा फायदा बाहेरची लोक उठवू शकत नाहीत.

सत्य हे सत्यच असते: राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉक्युमेंटरीवरील बंदीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, सत्य नेहमीच समोर येत असल्याचे आपण शास्त्रात, भगवद्गीता आणि उपनिषदांमध्ये वाचले आहे. सत्याला कधीच लपवून ठेऊ शकत नाही. तुम्ही माध्यमांना दाबून ठेऊ शकता. तुमच्याकडून सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करू शकता, मात्र सत्य हे सत्य असते.

जामिया मिलिया विद्यापीठातील ३ विद्यार्थ्यांना अटक

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात बीबीसीची पंतप्रधान मोदी यांच्यावरील डॉक्युमेंटरी स्क्रिनिंगची घोषणा करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. वातावरण गढूळ करण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news