पाकिस्तानातून आचार्यांनी आणल्या जैन मुनींच्या पादुका

पाकिस्तानातून आचार्यांनी आणल्या जैन मुनींच्या पादुका

बडोदा; वृत्तसंस्था :  आचार्य धर्मधुरंधर सुरीश्वर महाराज हे पाकिस्तान दौर्‍यावरून परतले आहेत. गुजरानवाला येथून जैन मुनी आत्मारामजी महाराज यांच्या पादुका त्यांनी सोबत आणल्या आहेत. जैन भाविक आता भारतातच या पादुकांचे दर्शन घेऊ शकणार आहेत.

आत्माराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सुरीश्वर महाराजांनी 2009 मध्ये परवानगी मागितली होती. ती मिळायला बरीच वर्षे लागली. जैनाचार्य नुकतेच पाकमधून भारतात परतले आहेत. सुरीश्वरजी यांच्यासोबत 18 जण होते. 21 मे रोजी वाघा सीमेवरून या सर्वांनी पाकिस्तानात प्रवेश केला होता. वाघापासून लाहोरसाठी 2 कार घेतल्या. पाक सरकारने 4 कमांडो आणि 4 पोलिस सुरक्षेसाठी दिले होते. 22 मे रोजी त्यांनी लाहोर संग्रहालयातील आत्माराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

लाहोरहून जैन मुनी गुजरानवालाला गेले. भारतातून आणलेल्या संगमरवरी पादुकांची आत्मारामजींच्या गुजरानवालातील समाधी मंदिरात प्रतिष्ठापना केली आणि त्याच सोबत घेऊन परतीला निघाले. या पादुकांची आता भारतात प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news