पंतप्रधान मोदींचे राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला मदतीचे आश्‍वासन

Raju Srivastava
Raju Srivastava

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते एम्सच्या आयसीयूत भरती आहेत. 46 तास उलटल्यावरही श्रीवास्तव यांच्या परिस्थितीत सुधारणा नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीवास्तव यांच्या पत्नीशी फोनवरून संवाद साधत तब्येतीबाबत माहिती घेतली, तसेच त्यांना धीर देत मदतीचे आश्‍वासन दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती घेतली आहे. बुधवारी दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना ते बेशुद्ध झाले होते. त्यांना दवाखान्यात दाखल केले गेले. त्यांच्या हृदयाच्या एका भागात 100 टक्के ब्लॉकेजेस दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news