देशात गर्भाशय कर्करोगाने दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू

देशात गर्भाशय कर्करोगाने दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाचा कर्करोग) हा भारतातील महिलांना होणारा दुसरा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. देशात दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू या आजाराने होतो. प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर त्वरित डॉक्टरकडे जाणे व उपचार सुरू करणे, हे त्यामुळे केव्हाही हितावहच.

आकडे बोलतात…

  • भारतात दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सरचे 1.23 लाख रुग्ण.
  • दरवर्षी 67 हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो.
  • सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत भारत जगात 5 व्या स्थानी.

महिलांमध्ये असे होते संक्रमण

ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे विविध स्ट्रेन्स या आजाराला कारणीभूत असतात. 35 ते 45 वर्षे वयाच्या महिलांना याचा धोका जास्त असतो. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास या आजाराची शक्यता बळावते.

टेस्ट कोणत्या, केव्हा कराव्यात?

  • पॅम स्मिअर टेस्ट आणि एचपीव्ही टेस्टने या आजाराचे निदान केले जाते. 25 ते 65 वर्षांच्या महिलांनी 3 ते 5 वर्षांनी ही टेस्ट केली पाहिजे.
  • 'मेनोपॉज'नंतरही (मासिक पाळी थांबणे) रक्तस्राव होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवले पाहिजे. लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होत
    असेल तर डॉक्टरकडे गेले पाहिजे.
  • पांढरे पाणी फार जात असल्यास, 'प्रायव्हेट पार्ट'मधून दुर्गंधी येत असल्यास, अचानक वजन कमी होत असल्यास ही लक्षणेही सर्व्हायकल कॅन्सरची असू शकतात.

90 टक्के रुग्ण निम्न, मध्यम उत्पन्नाच्या देशांत

जगभरात 2020 मध्ये 6 लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आढळून आली. पैकी 3.42 लाख मृत्यू झाले. 90 टक्के रुग्ण निम्न तसेच मध्यम उत्पन्न गटातील देशांतले आहेत.

या आजाराचे 3 प्रकार

1) स्क्वॅमस सेल कार्सिनोमा
2) अ‍ॅडेनोकार्सिनोमा
3) मिक्स्ड कार्सिनोमा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news