केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  रक्षाबंधनपूर्वीच केंद्रीय कर्मचार्‍यांना गोड बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्यातील उपभोक्‍ता मूल्य सूचकांकचे (एआयसीपीआय) आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. आता त्याची घोषणा झाली आहे.

महागाई भत्त्यात होणारी वाढ ही 'एआयसीपीआय'च्या आकड्यांवर अवलंबून असते. 'एआयसीपीआय'च्या पहिल्या सहामाहीमधील आकडे जारी करण्यात आले आहेत. यानुसार आता 'एआयसीपीआय' नवा आकडा 0.2 गुणाच्या वेगासह 129.2 वर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news