उत्तर भारतात तापमान उणे चार अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याचा इशारा

उत्तर भारतात तापमान उणे चार अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याचा इशारा

नवी दिल्ली : उत्तर भारतातील थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, हिमालय पर्वतरांगांत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काही ठिकाणी तापमान उणे चार अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते, असे हवामान क्षेत्रातील तज्ज्ञ नवदीप दहिया यांनी सांगितले आहे.

14 ते 19 जानेवारी दरम्यान दिल्ली, उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या ठिकाणी बोचरी थंडी राहू शकते. थंडीबरोबरच धुक्याचा प्रकोप पुढील काही काळ कायम राहणार आहे. विशेषतः 13 ते 17 जानेवारी या कालावधीत दिवसा आणि रात्री उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा या राज्यांत धुके जास्त राहण्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news