नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (एस.पी.) अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 55 सशस्त्र जवान यापुढे पवार यांना सुरक्षा प्रदान करतील, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना झेड प्लस व्हीयआपी सुरक्षा प्रदान करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सीआरपीएफने त्वरित या निर्णयाची अंमलबजावणी करीत पवारांना झेड प्लस व्हीआयपी सुरक्षा पुरविली आहे.