“मला अडकून राहायचे नाही,” युजवेंद्र चहल धनश्रीसोबतच्या घटस्फोटावर स्पष्टच बोलला...

डेटिंग आयुष्यावरही त्‍याने मौन सोडले
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma |
युजवेंद्र चहल, धनश्री वर्माPudhari File Photo
Published on
Updated on

yuzvendra chahal speaks on divorce with dhanashree dating rj mahavash

पुढारी ऑनलाईन :

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने अभिनेत्री धनश्री वर्मासोबतच्या आपल्या घटस्फोटावर स्पष्टपणे बोलताना सांगितले की, तो आता त्या टप्प्यातून पुढे गेला आहे. धनश्रीने याआधी चहलविषयी काही गोष्टी मांडल्या होत्या, त्यावर प्रतिक्रिया देताना चहल म्हणाला की, तो आता त्या सगळ्यात अडकून राहू इच्छित नाही. यासोबतच त्याने आपल्या डेटिंग आयुष्याविषयीही मौन सोडले आहे.

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma |
भोपाळचा 'रहमान डकैत' नेमका कोण? १४ राज्यात गुन्हेगारी नेटवर्क, मागावर ६ राज्यांचे पोलीस

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची वैयक्तिक आयुष्य गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी त्याने अभिनेत्री धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतला. चार वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर चहलला आरजे आणि अभिनेत्री महवशसोबत अनेकदा पाहिले गेले. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या, मात्र त्यांनी नेहमीच आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असे सांगितले.

घटस्फोट आणि डेटिंगवर चहल काय म्हणाला?

घटस्फोटानंतर धनश्रीने चहलविषयी अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. ‘राइज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोदरम्यान तिने क्रिकेटरवर काही आरोप केले आणि घटस्फोटाबाबतही भाष्य केले. त्या वेळी चहलने तिच्या वक्तव्यांना उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा त्याने या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma |
महिलेने रात्री एका वस्तूची दिली ऑर्डर, डिलिव्हरी बॉयला आला संशय, ग्राहकाचा वाचला जीव

एका मुलाखतीत युजवेंद्र चहल म्हणाला,

“माझ्या आयुष्यातील तो एक अध्याय होता आणि तो आता संपला आहे. मी त्या सगळ्यातून बाहेर पडलो आहे. त्या गोष्टींबद्दल बोलून पुन्हा प्रतिक्रिया येतील, त्या जागी मला अडकून राहायचे नाही. आता माझे स्वतःचे आयुष्य आहे आणि तिचे स्वतःचे. एवढीच सोपी गोष्ट आहे. ती तिच्या आयुष्यात आनंदी राहो आणि मी माझ्या आयुष्यात शांततेत राहू इच्छितो. खुश राहा यार, कुणाला दुःखी करून काय मिळणार आहे?”

लहानपणापासून सहन केलेल्या ट्रोलिंगवर काय म्हणाला चहल?

चहलने आपल्या डेटिंगविषयी सुरू असलेल्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. लंडनमध्ये महवशसोबत दिसलेल्या व्हिडिओवर बोलताना तो म्हणाला, “मित्रासोबत फिरायला गेलो की व्हिडिओ येतोच. आमच्यात कोणतेही रिलेशनशिप नाही. मी सध्या सिंगल आहे आणि खुश आहे.”

सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर बोलताना चहल म्हणाला, “मी इंटरनेटला फार गंभीरपणे घेत नाही. जिथे प्रेम मिळते, तिथे थोडा द्वेषही असतो.”

तो पुढे म्हणाला, “मला फारसा फरक पडत नाही. आयुष्यात मी शिव्या, ट्रोलिंग सगळं सहन केलं आहे. त्यामुळे आता मी त्यातून बाहेर पडलो आहे. लोक शिव्या देतील, देऊ द्या. काही अडचण नाही. तुम्ही खुश राहा. मी बॉडी शेमिंगलाही सामोरा गेलो आहे. आधी सोशल मीडिया नवीन असल्यामुळे फरक पडायचा, पण आता ज्याला यायचंय तो येऊ दे, शिव्या देऊन जाऊ दे. द्वेष येणारच, काहीही केलं तरी.”

दरम्यान, घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री पुन्हा एकत्र दिसू शकतात, अशी चर्चा आहे. दोघेही ‘द 50’ या नव्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी बातमी आहे. या शोचा फॉरमॅट अजून स्पष्ट झालेला नाही. मात्र धनश्री आणि चहल पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेमुळे चाहते खूप उत्सुक आहेत. तथापि, दोघेही ‘द 50’ या शोमध्ये दिसणार आहेत की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news