भोपाळचा 'रहमान डकैत' नेमका कोण? १४ राज्यात गुन्हेगारी नेटवर्क, मागावर ६ राज्यांचे पोलीस

बॉलीवूडच्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील ‘रहमान डकैत’ या पात्राची चर्चा सुरू असतानाच, त्याच नावाचा एक खरा आणि अत्यंत धोकादायक गुन्हेगार सूरतमध्ये पकडला गेला आहे.
who is rahman dacoit bhopal irani dera gang
भोपाळचा 'रहमान डकैत' नेमका कोण? १४ राज्यात पसरलंय गुन्हेगारी नेटवर्क, मागावर ६ राज्यांचे पोलीसFile Photo
Published on
Updated on

who is rahman dacoit bhopal irani dera gang wanted in six states police

पुढारी ऑनलाईन :

बॉलीवूडच्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील ‘रहमान डकैत’ या पात्राची चर्चा सुरू असतानाच, त्याच नावाचा एक खरा आणि अत्यंत धोकादायक गुन्हेगार सूरतमध्ये पकडला गेला आहे. भोपाळचा कुख्यात राजू ईरानी ऊर्फ आबिद अली ऊर्फ रहमान डकैत याला सूरत क्राईम ब्रँचने मोठा गुन्हा करण्यापूर्वीच अटक केली. त्याच्या शोधात देशातील सहा राज्यांची पोलीस यंत्रणा होती. त्याचे गुन्हेगारी नेटवर्क तब्बल 14 राज्यांमध्ये पसरलेले आहे. आलिशान गाड्यांबरोबरच घोडे पाळण्याचाही त्याला शौक आहे.

who is rahman dacoit bhopal irani dera gang
आकाशात अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा संगम! सोमनाथ मंदिराचा ड्रोन शो, PM मोदींनी शेअर केले दिव्य क्षण

सध्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘रहमान डकैत’ या पात्रामुळे चर्चा सुरू असतानाच, त्याच नावाचा खरा आणि अत्यंत धोकादायक गुन्हेगार सूरतमध्ये गजाआड झाला आहे. त्याचे खरे नाव अब्बास अली असून गुन्हेगारी जगतात तो राजू ईरानी आणि रहमान डकैत या नावाने कुख्यात आहे. भोपाळमधील ‘ईरानी डेरा’ या भागाचा तो सरगना असून, त्याच्या अटकेसाठी देशातील सहाहून अधिक राज्यांची पोलीस यंत्रणा शोध घेत होती. सूरतमध्ये तो एखादी मोठी घटनेला आकार देण्याच्या तयारीत असतानाच सूरत क्राईम ब्रँचने त्याला अटक केली.

ही संपूर्ण कारवाई एका गोपनीय माहितीवरून सुरू झाली. सूरत क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक जे.एन. गोस्वामी आणि त्यांच्या पथकाला माहिती मिळाली की भोपालचा कुख्यात गुन्हेगार ‘रहमान डकैत’ सूरतमध्ये दाखल झाला आहे. माहिती खात्रीशीर होती. तो इथे कोणाला तरी लक्ष्य करण्याच्या तयारीत होता. पथक तात्काळ सक्रिय झाले आणि काही तासांतच त्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली, ज्याच्या मागे सहा राज्यांची पोलीस यंत्रणा महिन्यांपासून फिरत होती.

who is rahman dacoit bhopal irani dera gang
‘अश्लील कंटेंटला परवानगी नाही’ Grok वादावर Elon Musk यांच्या X प्लॅटफॉर्मचा मोठा निर्णय

डीसीपी भावेश रोजिया यांच्या मते, हा एखादा साधा गुन्हेगार नसून संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्क चालवणारा मास्टरमाइंड आहे. त्याचे खरे नाव अब्बास अली असले तरी तो राजू ईरानी आणि रहमान डकैत या नावांनी ओळखला जातो. भोपाळमधील ईरानी डेरा या भागातून तो आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवत होता. जिथे त्याच्या नेटवर्कची सतत ये-जा असायची.

राजू ईरानीच्या अंडरमध्ये सहाहून अधिक टोळ्या कार्यरत असून या टोळ्या 14 पेक्षा जास्त राज्यांमध्ये सक्रिय आहेत. कुठे चोरी करायची, कोणत्या राज्यात कोणती टोळी पाठवायची, कोणत्‍या घटनेला आकार द्यायचा हे सर्व निर्णय राजू ईरानी स्वतः घेत असे.

त्याचे नेटवर्क इतके संघटित होते की प्रत्येक टोळीला वेगवेगळी कामे दिली जात. काही टोळ्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत, काही पोलीस किंवा CBI अधिकारी असल्याचे भासवून लोकांकडून दागिने आणि रोख रक्कम लुटत. कुठे बनावट नाकाबंदी करून तपासणी केली जाई, तर कुठे जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला जाई.

हत्यारे बाळगणे आणि दहशतीच्या जोरावर वसुली करणे ही या टोळीची ओळख होती. पोलीस नोंदीनुसार त्याच्यावर लूट, दरोडा, फसवणूक, बेकायदेशीर कब्जा आणि शस्त्रसंबंधित अशा 10 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

आलिशान जीवनशैलीचा शौक

गुन्ह्यांतून कमावलेला पैसा राजू ईरानी आणि त्याचा भाऊ जाकिर अली ऐषआरामात उडवत असत. आलिशान कार, महागड्या बाइक्स आणि अगदी घोडेसुद्धा त्यांनी पाळले होते. ते स्वतः फारसे मैदानात उतरायचे नाहीत, पण आपल्या गुर्ग्यांच्या माध्यमातून घटना पार पाडत असत. चोरीचा माल कुठे विकायचा, कोणाला सोडवायचे हे सर्व निर्णय तेच घेत.

डीसीपींनी सांगितले की, भोपाळमध्ये साबिर नावाच्या एका व्यक्तीने या टोळीची माहिती पोलिसांना दिली होती. याचा बदला म्हणून राजू ईरानी आणि त्याचा भाऊ जाकिर यांनी त्याला घरात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अत्यंत क्रुर गुन्ह्यांच्या श्रेणीत येतो आणि या प्रकरणातही तो आरोपी आहे.

भोपाळ ते सूरत फरारीचा प्रवास

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भोपाळ पोलिसांनी ईरानी डेरा भागात मोठी कॉम्बिंग ऑपरेशन राबवली होती. 150 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 34 संशयितांना ज्यात महिलांचाही समावेश होता. ताब्यात घेण्यात आले. मात्र राजू ईरानी तेथून फरार झाला होता. महाराष्ट्र आणि इतर राज्यांत भटकत तो अखेर सूरतमध्ये पोहोचला. कदाचित आणखी एका मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत. पण यावेळी सूरत क्राईम ब्रँचच्या सतर्कतेमुळे तो वेळेत पकडला गेला.

सध्या राजू ईरानी सूरत क्राईम ब्रँचच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विविध राज्यांची पोलीस यंत्रणा त्याच्याशी संबंधित फाईल्स तपासत आहेत. चित्रपटातील नाव, खरा गुन्हेगार आणि भयावह नेटवर्क—सहा राज्यांची पोलीस यंत्रणा ज्याच्या मागावर होती, तो रहमान डकैत अखेर गजाआड आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news