

नवी दिल्ली : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात काही तरुण आपल्याला इजा होईल याचा विचार न करता स्टंट करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पानांमध्ये बनविलेले लाल मुंग्यांचे घरटे हातात घेतलेले दिसत आहे.
त्यात हजारो मुंग्या असल्याचे दिसते. परंतु, त्या मुंग्या पानासह खाण्यासाठी तरुण प्रथम त्या पानावर मीठ, मसाला टाकतो. नंतर ते पान मुंग्यांसह तोंडात टाकतो. चावण्याचा प्रयत्न करताच, त्याच्या चेहर्यावर वेदना आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येते.
पुढच्याच क्षणी, तो पानाचा तुकडा थुंकून टाकतो. यानंतर लगेचच, हजारो मुंग्या त्याच्या चेहर्यावर आणि मानेवर चढतात. मुंग्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तो जोरजोरात ओरडत सैरावैरा धावताना दिसतो.