केजरीवालांसह आपचे 'हे' दिग्गज नेते पिछाडीवर

Delhi Election Results 2025 | पोस्टल मतपत्रिकांचे कल आले हाती
Delhi Election Results 2025
दिल्ली निवडणुकीचे पहिले कल हाती आले आहेत. Pudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली विधानसभा निवडणुक मतमोजणीला आज शनिवारी सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी ३६ जागा बहुमतांसाठी गरजेच्या आहेत. सुरूवातीच्या कलानुसार, भाजप ५०, आप १९, तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.

सुरूवातीच्या कलानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी आम आदमी पार्टी बॅकफूटवर पडली आहे. तर भारतीय जनता पार्टी २७ वर्षीनंतर दिल्लीत कमबॅक करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आपचे दिग्गज अरविंद केजरीवाल, आतिशी आणि सिसोदिया हे सर्वजण पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीत मागे पडले आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. येथून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. त्याचबरोबर जंगपुरा येथून माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कालकाजी येथून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी देखील पिछाडीवर पडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news