बुलाती है.. मगर जाने का नही.. विवाहितेच्या बोलवण्यावरून प्रियकर रात्री घरी गेला अन् जीवाला मुकला!

मध्यरात्री महिलेच्या बोलावण्यावरून घरी पोहोचलेल्या प्रियकराला महागात पडले..
up crime news
बुलाती है.. मगर जाने का नही.. विवाहितेच्या बोलवण्यावरून प्रियकर रात्री घरी गेला अन् जीवाला मुकला!file photo
Published on: 
Updated on: 

young man and lover who arrived at the woman call beaten to death

पुढारी ऑनलाईन : एका महिलेच्या बोलावण्यावरून तिच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. या घटनेमुळे साढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीरपूर गावात सकाळीच मोठा गोंधळ निर्माण झाला.

up crime news
INDIA Bloc Rally in Delhi : राहुल गांधींची मोठी खेळी! रॅलीमुळे व्यापाऱ्यांना १२ हजार कोटींचा फटका की ५० कोटींचा फायदा?

मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, घटनेतील आरोपी घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

मध्यरात्री महिलेच्या बोलावण्यावरून घरी पोहोचला प्रियकर

साढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीरपूर गावात राहणारे विजय प्रकाश ऊर्फ पप्पू तिवारी यांचा २८ वर्षीय मुलगा अतुल ऊर्फ गोपाल हा बारीगाव येथील एका पेट्रोल पंपावर काम करत होता. याशिवाय तो ऑटोदेखील चालवत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे गावातीलच विकास अवस्थी यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. शनिवारी रात्री उशिरा अतुल ऑटो घेऊन घरी परतला होता. त्यानंतर तो घराबाहेरच झोपला होता. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, रात्री उशिरा विकासच्या पत्नीने अतुलला फोन करून भेटण्यासाठी घरी बोलावले.

up crime news
'माझ्या जीवाला धोका...' मराठी अभिनेत्‍याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत

महिलेच्या बोलावण्यावरून अतुल रात्री सुमारे दोन वाजता तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. याचदरम्यान विकास आणि घरातील इतर सदस्य जागे झाले. महिलेच्या भेटीसाठी आलेल्या अतुलला पाहताच ते संतप्त झाले. त्यानंतर सर्वांनी मिळून अतुलला लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

अतुल वेदनेने ओरडत होता, मात्र घरातील लोकांनी त्याची दया केली नाही. त्याला गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर अतुलला त्याच अवस्थेत घरात सोडून विकासचे वडील कल्लू हे अतुलच्या घरी गेले. त्यांनी अतुलच्या कुटुंबीयांना तो त्यांच्या घरी असल्याची माहिती दिली.

रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

विकासच्या वडिलांकडून ही माहिती मिळताच अतुलचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले आणि तातडीने विकासच्या घरी पोहोचले. तेथे अतुल गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. कुटुंबीयांनी त्याला तातडीने नौबस्ता येथील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अतुलला मृत घोषित केले.

अतुलच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयात उपस्थित कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला. कुटुंबीय संतप्त झाले आणि सकाळीच अतुलचा मृतदेह घेऊन साढ पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी साढ पोलीस ठाण्याचे प्रभारी के. के. मिश्रा यांनी सांगितले की, पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला. तपासादरम्यान समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.