Yamunakath 2026 | ‘यमुनाकाठ’ दिवाळी अंक राजधानीतील मराठी समाजाचे सांस्कृतिक, वैचारिक प्रतिबिंब 

दिवाळी अंक प्रकाशन कार्यक्रमात विजया रहाटकर यांचे प्रतिपादन  
Yamunakath Diwali Ank Release Delhi
राजधानी दिल्लीत ‘यमुनाकाठ २०२६’ या दिवाळी विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन झाले.Pudhari
Published on: 
Updated on: 

Yamunakath Diwali Ank Release Delhi

नवी दिल्ली : दिल्लीसारख्या महानगरात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुरू केलेला "यमुनाकाठ" हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘यमुनाकाठ’च्या माध्यमातून राजधानीतील मराठी समाजाचे सांस्कृतिक आणि वैचारिक प्रतिबिंब उमटत असल्याचेही प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. त्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत ‘यमुनाकाठ २०२६’ या दिवाळी विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

माणूस कुठेही गेला, तरी त्याला आपल्या मातीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी जोडून ठेवणारे संस्कार महत्त्वाचे असतात. गोदावरीच्या काठावर घालवलेल्या बालपणीच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. अशा शब्दांत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीशी असलेले नाते अधोरेखित केले. 

Yamunakath Diwali Ank Release Delhi
Delhi Police Protest : दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर पोलिसांचे आंदोलन, अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी

याप्रसंगी विजया रहाटकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड, वरिष्ठ पत्रकार अभिजित कांबळे, खासदार अमर काळे, अंकाच्या संपादक ॲड. प्राची गवांदे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच दिल्लीस्थित मराठी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, विद्यार्थी, व्यावसायिक आदी मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. दिल्लीसह देशभरातील आणि जगाच्या काही भागातील मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक विश्वाला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने द समिधा इंडिया फाउंडेशनने या विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे. 

ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी दिल्लीतील मराठी समाजाच्या वाटचालीचा आढावा घेतला. गेली ५८ वर्षे दिल्लीमध्ये वास्तव्यास असलेल्या नाईक यांनी राजधानीत सुमारे चार लाख मराठी नागरिक राहत असल्याचा उल्लेख केला. एवढ्या मोठ्या संख्येने मराठी समाज दिल्लीत असूनही भाषा आणि संस्कृतीच्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘यमुनाकाठ’सारख्या उपक्रमांमुळे मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी आणि आपले सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Yamunakath Diwali Ank Release Delhi
INDIA Bloc Rally in Delhi : ज्ञानेश कुमारांना CEC पदावरून हटवले जाईल; मोदी-शहांविरोधात लढणार; राहुल गांधींचा निर्धार

या विशेषांकाच्या संपादक ॲड. प्राची गवांदे यांनी अंकाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. दिल्लीसह देशभरातील आणि काही अंशी जगातील मराठी समाजाचे अनुभव, विचार, साहित्य आणि सांस्कृतिक जाणीवा यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला. मुलाखती, लेख, रिपोर्ताज, फोटो फीचर अशा विविध प्रकारासह साहित्य, राजकारण, प्रशासन, माध्यम, कायदा, धोरणनिर्मिती, संशोधन, लेखन, सामाजिक कार्य, छायाचित्रण, शिल्पनिर्मिती अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांची गुंफण या अंकात असल्याचे त्या म्हणाल्या. या अंकासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये, नामदेव काटकर, अजिंक्य बनसोडे, ऋषी मोरे, लेशपाल जवळगे, रुपेश माने यांचेही त्यांनी आभार मानले. 

अंकात काय काय? 

यमुनाकाठ दिवाळी अंकात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, माजी केंद्रीय पोलाद सचिव अरुणा लिमये यांच्या मुलाखती आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. श्रीकांत शिंदे, खा. अमर काळे, खा. राजाभाऊ वाजे, प्रशासकीय अधिकारी सुशील गायकवाड, श्वेता सिंघल, सुप्रिया देवस्थळी, प्रतिभा पारकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, विजय चोरमारे, सागर कुलकर्णी, उमेश कुमार यांचे लेख आहेत. आशय गुणे, प्रमोद जगताप यांचे खास रिपोर्ताज आणि शिल्पकार अनिल सुतार, उत्तम छायाचित्रकार असलेले अधिकारी पदमसिंह पाटील यांचे फोटो फीचर देखील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.